Ind vs Pak : रोहित शर्माने केला 'हा' अनोखा विक्रम; भारतासाठी रचला इतिहास

ही कामगिरी करणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे

Updated: Oct 23, 2022, 02:55 PM IST
Ind vs Pak : रोहित शर्माने केला 'हा' अनोखा विक्रम; भारतासाठी रचला इतिहास title=

Ind vs Pak : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (T20 World Cup) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना मेलबर्नमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने युझवेंद्र चहलच्या (yuzvendra chahal) जागी रविचंद्रन अश्विनला (ravichandran ashwin) खेळवण्याचा निर्णय घेतला आहे, तर हर्षल पटेलला (harshal patel) वेगवान गोलंदाजांमध्ये स्थान मिळालेले नाही. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील तीन वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे. 

रविवारी, 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध नाणेफेकसाठी मैदानात उतरताच त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. सर्व टी-20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला. एवढेच नाही तर ही कामगिरी करणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे.

India Vs Pakistan: राष्ट्रगीत सुरु असताना रोहित शर्माला अश्रू अनावर, Video Viral

रोहित शर्मा आठव्या टी-20 विश्वचषकात भारताकडून मैदानात उतरला आहे. 2007 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतही त्याने भाग घेतला होता. हा वर्ल्ड कप भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. तेव्हापासून रोहित शर्मा देशासाठी प्रत्येक टी-20 विश्वचषक खेळला आहे. भारताच्या टी-20 विश्वचषक 2022 मध्येही रोहितशिवाय एकही खेळाडू नाही, जो 6 किंवा त्याहून अधिक विश्वचषक खेळला आहे.

दरम्यान, रोहित शर्मा व्यतिरिक्त, बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन हा एकमेव खेळाडू आहे जो 2007 पासून प्रत्येक टी-20 विश्वचषकाचा भाग आहे. मात्र रोहित शर्मा हा पहिला खेळाडू आहे ज्याने ही कामगिरी केली आहे, कारण बांगलादेश संघाने 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत अद्याप एकही सामना खेळलेला नाही.