Video: विराटला खुन्नस दिल्याचा रोहितने घेतला बदला! बांगलादेशचा कॅप्टन Out झाल्यानंतर..

T20 World Cup Rohit Sharma Revenge For Virat Kohli: भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये काही क्षण असे आले की जिथे दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये वाद होतो की काय असं वाटू लागलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 23, 2024, 10:58 AM IST
Video: विराटला खुन्नस दिल्याचा रोहितने घेतला बदला! बांगलादेशचा कॅप्टन Out झाल्यानंतर.. title=
सामन्यातील ते दोन क्षण चर्चेत

T20 World Cup Rohit Sharma Revenge For Virat Kohli: भारत आणि बांगलादेशदरम्यानच क्रिकेट मैदानावरील वैर काही नवीन नाही. दोन्ही देशांतील चाहत्यांपासून ते अगदी खेळाडूंपर्यंतची खुन्नस जगजाहीर आहे. मागील काही वर्षांमध्ये तर दोन्ही देशांमध्ये एकमेकांच्या वरचढ राहण्यासाठी चाहत्यांमध्ये मैदानाबरोबरच सोशल मीडियावरुनही शाब्दिक देवाण-घेवाण होताना दिसते. अर्थात मैदानातही दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांना ठसन देताना दिसतात. शनिवारी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सुपर 8 च्या फेरीतील सामन्यातही असेच चित्र पाहायला मिळालं. या संपूर्ण सामन्यात असे बरेच क्षण चाहत्यांना पाहायला मिळाले तसेच कॅमेरातही कैद झाले जेव्हा दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र यातही विराट कोहली बाद झाल्यानंतर त्याच्याकडे डोळे वटारुन पाहणाऱ्या बांगलादेशच्या तन्झीम हसन साकिबचा फोटो चांगलाच चर्चेत राहिला. मात्र तन्झीमने केलेल्या या कृत्याला भारतीय कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशच्या फलंदाजीच्या वेळेस जशास तसं उत्तर दिलं. 

विराटला दिला लूक

तन्झीम हसन साकिबने विराटला 37 धावांवर असताना बोल्ड केलं. त्यानंतर तन्झीमने विराटला खुन्नस दिल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर तन्झीमच्या या लूकची चांगलीच चर्चा रंगली. हा सारा प्रकार घडला तेव्हा कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्याने ड्रेसिंग रुममधून हा सारा प्रकार पाहत होता. विराटला दिलेला लूक रोहितला खटकल्यानेच त्याने बांगलादेशच्या फलंदाजीच्या वेळेस या खुन्नशीचं जशास तसं उत्तर दिलं. 

रोहितने घेतला बदला

197 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला लिटन दास आणि तन्झीद हसनने उत्तम सुरुवात करुन दिली. लिटन दास आणि हससने पहिल्या 4 ओव्हरमध्ये 30 हून अधिक धावा केल्या. मात्र 5 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर लिटन दास हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. लिटन दासची विकेट पडल्यानंतर रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसला. त्याने बांगलादेशचा कर्णधार लिटन दासला निरोप देताना अगदी अपशब्द वापरल्याचंही कॅमेरात कैद झालं आहे. हातीची मूठ आवळून हावेत मारत रोहितने अगदी द्वेषात लिटनच्या विकेटचा आनंद साजरा केल्याचं पाहायला मिळालं. विराटला देण्यात आलेल्या लूकचा बदला रोहितने घेतल्याची सोशल नेटवर्किंगवर सुरु आहे.

नक्की पाहा >> Video: 'काय करतोय? तो आताच..', रोहितने कुलदीपला झापलं! Stump Mic मध्ये झालं रेकॉर्ड

सामन्यात नेमकं काय घडलं?

भारत आणि बांगलादेश सामन्यामध्ये बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने 20 ओव्हरमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 196 धावा केल्या. भारताकडून हार्दिक पंड्याने नाबाद 50 धावांची खेळी केली. त्यापूर्वी विराट कोहलीने 37 तर ऋषभ पंतने 36 धावांची उत्तम खेळी केली. 197 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्सच्या मोबदल्यात 146 धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताने सामना 50 विकेट्सने जिंकला.

नक्की वाचा >> T-20 World Cup मधला सर्वात धक्कादायक निकाल! अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलं

भारताने घेतलेल्या 8 विकेट्सपैकी सर्वाधिक म्हणजेच 3 विकेट्स कुलदीप यादवने घेतल्या. या विजयासहीत भारत ग्रुप 1 मध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. भारताचा पुढचा सामना 24 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.