T20 WC : सेमी फायनलसाठी गांगुलीची 'या' चार संघांना पसंती; पाकिस्तानबाबत वर्तवलं मोठं भाकीत

टी-20 विश्वचषक स्पर्धेत कोणते चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील याबाबत सौरव गांगुलीने मोठा दावा केलाय

Updated: Oct 23, 2022, 12:28 PM IST
T20 WC : सेमी फायनलसाठी गांगुलीची 'या' चार संघांना पसंती; पाकिस्तानबाबत वर्तवलं मोठं भाकीत title=

T20 World Cup : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये (ICC T20 World Cup) सुपर-12 ची लढाई सुरु झाली आहे. सुपर-12 च्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा 89 धावांनी पराभव केला. 2022 चा टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवला जात आहे. आज कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ 2022 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 world cup) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) सामन्याने मोहिमेला सुरुवात करणार आहे. मेलबर्नच्या (melbourne) मैदानावर भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता हा सामना सुरु होणार आहे. मात्र या सामन्याआधीच भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने पाकिस्तानच्या संघाबाबत भाष्य केले आहे. तसेच सौरव गांगुलीने (sourav ganguly) टी-20 विश्वचषक स्पर्धेत कोणते चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील याबद्दलचे त्यांचे भाकीत वर्तवले आहे. (former BCCI president Sourav Ganguly select four team for T20 World Cup Semi Finalists)

आयसीसी टी-20 विश्वचषक  2021 स्पर्धेमध्ये भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठता आली नव्हती. इंडिया टुडेसोबत बोलताना गांगुली म्हणाला की, 'आता भूतकाळात राहण्याची गरज नाही. पूर्वी जे घडले त्याबद्दल बोलून काही उपयोग नाही. भारतीय संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. विश्वचषकातील लढाई पूर्णपणे वेगळी आहे. या दोन-तीन आठवड्यांमध्ये जो संघ चांगले क्रिकेट खेळतो, तोच जिंकतो. आत्ताच काही सांगणे कठीण आहे. पण आपल्याकडे चांगली टीम आहे.'

'आपल्या संघात मोठे शॉर्टस खेळणारे खेळाडू आहेत. सामन्याचा काही तासांत टी-20 फॉरमॅटमधील फॉर्म खूप महत्त्वाचा ठरतो, असेही सौरव गांगुली म्हणाला. जेव्हा गांगुलीला वर्ल्ड कप स्पर्धेतील टॉप चार संघ निवडण्यास सांगितले तेव्हा त्याने, 'मी भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची निवड करेन. दक्षिण आफ्रिकेकडे चांगली गोलंदाजी आहे आणि ऑस्ट्रेलियात सामने सुरु असल्याने संघाला त्याता फायदा होईल, असे म्हटले.