दुबई : टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीला नवा विजेता मिळाला. कांगारू संघाने 8 विकेट्स राखून किवी संघावर विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजांनी किवीच्या गोलंदाजांना जेरीस आणलं. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर टी 20 वर्ल्ड कप 2021 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 8 विकेट्सने मात केली. यासह ऑस्ट्रेलियाने टी 20 वर्ल्ड कप जिंकला.
न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. धडाकेबाज फलंदाजांनी बाजी पलटवली.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक नाबाद 77 धावा केल्या. तर सलामीवीर डेव्हीड वॉर्नरमे 53 धावांची अर्धशतकी खेळी. या खेळीसह वॉर्नरने ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनचा रेकॉर्ड ब्रेक केला. यासह वॉर्नर एका टी वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा पहिला फलंदाज ठरला. (t20 world cup final match 2021 australia david warner become 1st australian batsman who most runs in single edition in t 20 world cup)
अंतिम सामन्याआधी वॉर्नरला हेडनचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 30 धावांची आवश्यकता होती. वॉर्नरने 30 धावा पूर्ण करताच हा विक्रम आपल्या नावे केला. डेव्हिड वॉर्नरने न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामन्यात 38 बॉलमध्ये 53 धावा केल्या आहेत.
डेव्हिड वॉर्नरने 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीनं अर्धशतकी खेळी केली आहे. IPL मध्ये वॉर्नरची कामगिरी विशेष राहिली नव्हती. मात्र टी 20 वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा मोठा वाटा आहे.
ऑस्ट्रेलियाकडून एका टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
डेव्हिड वॉर्नर - 289 (T20 World Cup 2021)
मॅथ्यू हेडन - 265 (T20 World Cup 2007)
शेन वॉटसन 249 (2012)