आज पासून सुरु होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) भारतीय संघ (Team India) ऑस्ट्रेलियात (australia) सराव करत आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह (rahul dravid) एकूण 16 कर्मचारी आणि 14 खेळाडूंसह 'मिशन मेलबर्न'साठी ऑस्ट्रेलियाला (australia) पोहोचली आहे. भारतीय संघ 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) पहिला सामना खेळणार आहे. गुरूवारी सकाळी बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय संघाचा आणि सर्व बॅकरूम स्टाफचा ग्रुप फोटो शेअर केला होता. या 16 सदस्यीय बॅकरूम कर्मचार्यांमध्ये फक्त 1 महिला कर्मचारी (Female Staff) ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे. ही महिला कर्मचारी कोण याचीच चर्चा सध्या सुरु आहे. (T20 World Cup 2022 who is rajlaxmi arora traveling with team india)
या बॅकरूम स्टाफमध्ये असलेल्या एकच महिला सदस्याचे नाव राजलक्ष्मी अरोरा (Raj Laxmi Arora) आहे. राजलक्ष्मी अरोरा बीसीसीआयमध्ये वरिष्ठ मीडिया प्रोड्युसर (Media Producer) आहेत. भारतीय खेळाडू आणि त्यांचे चाहते यांच्यातील बंध दृढ करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. राजलक्ष्मी अरोरा यांचे आणखी एक काम खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही मालिकेपूर्वी राजलक्ष्मी (Raj Laxmi Arora) भारतीय संघाचे खेळाडू आणि माध्यमे यांच्यातील संवादाचे कामही सांभाळतात. 2019 मध्ये, राजलक्ष्मी अरोरा यांना बीसीसीआयच्या (BCCI)अंतर्गत तक्रार समितीचे प्रमुख बनवण्यात आले होते, ज्यांनी खेळाडूंच्या गैरवर्तनासारख्या मुद्द्यांवर लक्ष ठेवले होते.
राजलक्ष्मी अरोरा यांनी तिच्या व्यावसायिक करिअरची सुरुवात कंटेंट रायटर म्हणून केली. 2015 मध्ये सोशल मीडिया मॅनेजर म्हणून बीसीसीआयमध्ये सामील झाली आणि आता ती वरिष्ठ मीडिया प्रोड्युसर आहे. राजलक्ष्मी अरोरा यांनी पुण्यातील (Pune) सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन (SIMC पुणे) मधून मीडियाची पदवी घेतली. राजलक्ष्मी अरोरा यांनी रिव्हरडेल हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि शाळेच्या बास्केटबॉल आणि नेमबाजी संघाच्या सदस्या होत्या.