IND vs ZIM: झिम्बाव्बेविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाकडून Zimbabwe ला 'इतक्या' रन्सचं लक्ष्य

सध्या ग्रुप 2 च्या पॉईंट्सटेबलमध्ये (Points table) टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे.

Updated: Nov 6, 2022, 04:29 PM IST
IND vs ZIM: झिम्बाव्बेविरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाकडून Zimbabwe ला 'इतक्या' रन्सचं लक्ष्य title=

T20 world cup 2022 : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये (T20 world cup 2022) आज टीम इंडियाचा (Team India) सामना झिम्बाव्बेशी (Zimbabwe) सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितच्या सेनेने पहिली फलंदाजी करत झिम्बाव्बेच्या टीमला 187 रन्सचं लक्ष्य दिलं आहे. सध्या ग्रुप 2 च्या पॉईंट्सटेबलमध्ये (Points table) टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे.

पॉईंट्सटेबलमधील कामगिरीमुळे टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचलीये. मात्र अव्वल स्थान गाठण्यासाठी टीम इंडियाला झिम्बाब्वेला मात देणं गरजेचं आहे.

रोहित शर्मा आणि संघ रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झिम्बाब्वे विरुद्धच्या लढतीत सुपर 12 चा शेवटचा सामना खेळणार आहे. पाकिस्तानने  बांगलादेशला पाच विकेट्सने पराभूत करून अंतिम चारमध्ये भारतासोबत सामील झाला आहे. भारताने यावेळी टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यावेळी संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संघात संधी देण्यात आली आहे.

रोहित शर्मा स्वस्तात बाद

भारतीय संघाला चौथ्या षटकातच पहिला धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 15 धावा करून बाद झाला. मोठा शॉट खेळण्याच्या नादात रोहित शर्माने आपली विकेट गमावली. त्यानंतर विराट कोहलीने आक्रमने खेळत चौकारांचा पाऊस पाडला आहे.

विराट, केएल राहुल बाद

भारतीय संघाला 12व्या षटकात दुसरा धक्का बसला. विराट कोहली 26 धावा करून बाद झाला. शॉन विल्यम्सने त्याची विकेट घेतली. त्याने केएल राहुलसोबत 48 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली. तर विराट पाठोपाठ केएल राहुलही बाद अर्धशतक करुन बाद झाला. केएल राहुलने 51 धावा केल्या. सिकंदर रझाने विकेट घेतली. 

सूर्यकुमार यादव (Surykumar Yadav) याने झिम्बाब्वे (Zimbabwe) विरुद्ध संघाच्या शेवटच्या गट सामन्यात 35 धावा पूर्ण केल्यामुळे क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये इतिहास रचला.सूर्यकुमार यादव आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 धावा करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. 

यादव दुसऱ्या क्रमांकावर 

सूर्यकुमार यादव (Surykumar Yadav) एका वर्षात 1000 धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी 2021 साली पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज मोहम्मद रिझवानने अशी कामगिरी केली होती. एवढेच नाही तर 2022 मध्ये तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज बनला.

भारत (प्लेइंग इलेव्हन) : केएल राहुल, रोहित शर्मा (क), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग