संपला विषय! राज्याचा पुढचा CM कोण? अमित शाह हसतच म्हणाले, 'सध्या महाराष्ट्रात...'

Maharashtra Assembly Election Amit Shah On Next CM of Maharashtra: भाजपाच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशनाच्या वेळेस अमित शाहांना पुढील मुख्यमंत्री कोण असेल यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी स्पष्टच याचं उत्तर दिलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 10, 2024, 12:20 PM IST
संपला विषय! राज्याचा पुढचा CM कोण? अमित शाह हसतच म्हणाले, 'सध्या महाराष्ट्रात...' title=
मुंबईत बोलताना अमित शाहांनी नोंदवलं मत

Maharashtra Assembly Election Amit Shah On Next CM of Maharashtra: भारतीय जनता पार्टीने आज विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा म्हणजेच संकल्पपत्र जाहीर केलं. मुंबईमध्ये पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत संकल्पपत्राचं जाहीर वाचन करण्यात आलं. शिक्षण, गुंतवणूक, महिला, शेतकरी, रोजगार यासारख्या सर्वांगिक गोष्टींचा समावेश असलेल्या संकल्पपत्रातील तरतुदींवर अमित शाहांबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश टाकला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अमित शाहांना महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न विचारण्यात या प्रश्नाला अमित शाहांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये आणि स्पष्टपणे उत्तर देत मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चांना पूर्विराम दिला आहे.

चर्चाना उधाण का?

"महाराष्ट्रातील जनतेची एकच भावना आहे. आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना विजयी करायचे आहे," असं विधान अमित शाह यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील जाहीर सभेत केलं. यावरुनच फडणवीस पुढील मुख्यमंत्री असल्याचे संकेत शाहांनी दिलेत अशी चर्चा सुरु झाली. असं असतानाच आज अमित शाहांनाच थेट मुख्यमंत्री कोण असेल यासंदर्भात प्रश्न विचारला गेला. त्यावर अमित शाहांनी हसतच उत्तर दिलं. 

अमित शाह काय म्हणाले?

"तुम्ही जो मुख्यमंत्रिपदासंदर्भात जो प्रश्न विचारला त्याचं मी आधी उत्तर देतो. कारण त्या उत्तरानंतर आता प्रश्न विचारायला ज्यांनी हात वर केले आहेत जे पुन्हा हात वर करणार नाही," असं अमित शाह यांनी म्हणताच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हसू लागले. स्वत: अमित शाहही यावर हसले. त्यानंतर पुढे बोलताना शाह यांनी, "सध्या महाराष्ट्रात युती सरकारचं नेतृत्व एकनाथ शिंदेंजी करत आहेत. एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री आहेत. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हे तिन्ही पक्ष एकत्र बसून हे ठरवतील. आम्ही शरद पवारांना कोणतीही संधी देणार नाही," असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> 'ही' भीती असल्याने CM शिंदेंनी राज ठाकरेंच्या लेकाविरुद्ध उमेदवार दिला; राऊतांचा दावा

जिंकणार यात कोणतीच शंका नाही

महायुतीचं जिंकणार का? यासंदर्भातील प्रश्नावर अमित शाहांनी, "बहुमताने भाजपा आणि मित्र पक्षांचं सरकार बनणार आहे. यात कोणतीची शंका नाहीये," असं उत्तर दिलं. काँग्रेस पक्ष जातीसंदर्भातील प्रश्न उपस्थित करुन समाजात विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहे, असंही अमित शाह म्हणाले.

कोणकोण होतं उपस्थित?

अमित शाहांबरोबरच राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, संकल्प पत्र बनवणाऱ्या समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते.