Crime News In Marathi: कर्नाटकातील बेंगळुरू येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सदाशिवनगर येथे राहणाऱ्या एका जोडप्याने सोशल मीडियावर घरातील व्हिडिओ शेअर करणे महागात पडले आहे. जोडप्याने त्यांच्या घरातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. गार्डनमधील हा व्हिडिओ असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. लोकांनी त्यांचे कौतुकदेखील केले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांच्या अडचणीत वाढ झाली. थेट पोलिसांत प्रकरण गेले.
37 वर्षांचा सागर गुरुंग आणि त्याची पत्नी उर्मिला कुमारी यांना बागकामाची खूप आवड आहे. सिक्कीमच्या नामची येथे राहणाऱ्या जोडप्याने त्यांच्या घरात अनेक रोपे लावली आहेत. किचनपासून ते गार्डनपर्यंत त्यांनी खूप झाडे लावली आहेत. हे जोडपं दोन वर्षांपूर्वी बेंगळुरू येथे शिफ्ट झाले होते. येथील सदाशिवनगरच्या एमएसआर नगरयेथे एक घर भाड्याने घेतलं होतं. सागर येथेच व्यवसाय करत होता. तर त्याची पत्नी उर्मिला गृहिणी होती. दोघांनी घरात खूप सारी झाडं व रोपं लावली होती.
उर्मिलाने सोशल मीडियावर एक अकाउंट तयार केले आहे. त्यावर रोज व्हिडिओ पोस्ट करते. तिने 18 ऑक्टोबर रोजी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तिने घरात लावलेल्या दोन डझन झाडांबद्दल माहिती दिली. तिने व्हिडिओदेखील दाखवला. तिच्या झाडांबद्दल तिने माहिती दिली. सोशल मीडियावर लोकांनी अनेक छान कमेंटदेखील केल्या आहेत. मात्र, काही लोकांची नजर त्या दोन झाडांवर गेली ज्यामुळं उर्मिला अडचणीत आली.
व्हिडिओत असलेल्या दोन झाडांकडे लोकांची नजर गेली. ते दोन झाडे गांजाची होते. त्यानंतर लोकांनी उर्मिला यांना घेरण्यास सुरुवात केली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 नोव्हेंबर रोजी दुपारी जोडप्याच्या घरावर छापा टाकला. सुरुवातीला गांज्याच्या रोप का लावले यावरह त्यांनी उत्तरे दिली आहे. आम्ही चौकशी केल्यानंतर दोन कुंड्यातून रोप खुडल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गांजाची रोप लावल्याचे कबुल केले. नंतर त्यांनी गांजा डस्टबिनमध्ये फेकल्याचे सांगितले. या रोपांचे वजन 54 ग्रॅम होते. पोलिसांनी हे जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती, आम्ही 5 नोव्हेंबरच्या दुपारी जोडप्याच्या घरावर छापेमारी केली. आम्हाला संशय आहे की, पोलिसांना आलेले बघून त्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी लगेचच रोप खुडून डस्टबिनमध्ये टाकले. व्यावसायिक हेतूसाठी त्यांनी ही झाडे लावल्याचे स्पष्ट केले आहेत.