India Vs Pakistan: राष्ट्रगीत सुरु असताना रोहित शर्माला अश्रू अनावर, Video Viral

टी 20 वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) हायहोल्टेज सामना सुरु आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या राष्ट्रगीत गाताना प्रत्येक भारतीयांच्या अंगावर शहारा नक्कीच आला असेल. भारतीय कर्णधार रोहित शर्माही आपल्या भावना आवरू शकला नाही.

Updated: Oct 23, 2022, 02:23 PM IST
India Vs Pakistan: राष्ट्रगीत सुरु असताना रोहित शर्माला अश्रू अनावर, Video Viral title=

T20 World Cup India Vs Pakistan Rohit Sharma Teary Eyed: टी 20 वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) हायहोल्टेज सामना सुरु आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असल्याचं गोलंदाजांनी दाखवून दिलं. गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून पाकिस्तानी फलंदाजांवर दबाव ठेवला. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनं (Arshdeep Singh) बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) स्वस्तात तंबूत पाठवलं. या सामन्यापूर्वी झालेल्या राष्ट्रगीत गाताना प्रत्येक भारतीयांच्या अंगावर शहारा नक्कीच आला असेल. भारतीय कर्णधार रोहित शर्माही आपल्या भावना आवरू शकला नाही. राष्ट्रगीत गाताना त्याच्या अश्रू तरळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

रोहित शर्मा चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून राष्ट्रगीत गाताना दिसत आहे. नंतर डोळे घट्ट मिटून वर आकाशाकडे पाहत भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून युजर्स आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. 

India Vs Pakistan: नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय का घेतला? रोहित शर्मा म्हणाला...

भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "एक चांगली खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर थोडे गवत आहे. दुसरीकडे थोडे ढगाळ आहे, त्यामुळे चेंडू थोडासा स्विंग होऊ शकतो. त्यामुळे याचा फायदा घेण्याचं आम्ही ठरवलं आहे. आता आमची तयारी पूर्ण झाली आहे." 

भारतीय संघ- रोहित शर्मा,  केएल राहुल, विराट कोहली,  सूर्यकुमार यादव,  हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल,  आर अश्विन,  मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.