टी 20 वर्ल्डकपसाठी Jasprit Bumrah टीम इंडियासोबतच असणार! बीसीसीआय अधिकाऱ्यानं सांगितलं...

भारतीय क्रीडारसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघासोबत असणार आहे.

Updated: Sep 30, 2022, 07:18 PM IST
टी 20 वर्ल्डकपसाठी Jasprit Bumrah टीम इंडियासोबतच असणार! बीसीसीआय अधिकाऱ्यानं सांगितलं... title=

T20 World Cup 2022 Jasprit Bumrah: भारतीय क्रीडारसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघासोबत असणार आहे. जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर गेला आहे. त्याचबरोबर टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात नसेल अशा बातम्याही समोर आल्या आहेत. जसप्रीत बुमराहच्या जागी संघात मोहम्मद सिराजला स्थान दिल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे. असं असलं तरी जसप्रीत बुमराह टी 20 वर्ल्डकप संघासोबत असणार आहे. कारण बुमराहच्या दुखापतीबाबत मेडिकल टीमने कोणताही निर्णय दिलेला नाही. सध्या मेडिकल टीमने बुमराह पाठदुखीचा त्रास होत असला सर्जरीची आवश्यकता नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह 6 ऑक्टोबरला टीमसोबत ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. मात्र संघात खेळणार की नाही याबाबतचा निर्णय 15 ऑक्टोबरला होणार आहे. 

बीसीसीआयचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टशी बोलताना सांगितलं की, "बुमराहला आरामाची गरज आहे. सध्या तो एनसीए मेडिकल स्टाफच्या संपर्कात असेल. नितीन त्याला बरं करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आम्ही अजूनही बुमराहला टी 20 वर्ल्डकप संघातून बाहेर केलेलं नाही. तो टीमसोबत ऑस्ट्रेलियाला जाईल आणि देखरेखीखाली असेल. आमच्याकडे बदल करण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे"

T20 World Cup: BCCI च्या चुकीमुळे Jasprit Bumrah जखमी?? 'या' दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ!

जसप्रीत बुमराहला आशिया कप 2022 स्पर्धेपूर्वीपासून पाठदुखीचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे आशिया कप 2022 स्पर्धेत भाग घेतला नव्हता. त्यानंतर जसप्रीत बुमराहचं टीम इंडियात घाईघाईने पुनरागमन केल्याचं अनेक दिग्गजांचं म्हणणं आहे. त्याला आणखी विश्रांती मिळायला हवी होती. जसप्रीत बुमराहने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत पुनरागमन केले होते.