Ind vs PaK : आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup ) पहिल्या उपांत्य फेरीत, न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव करून पाकिस्तान संघ (pak vs NZ) अंतिम फेरीत पोहोचला आहे. आपल्या संघाच्या या विजयाने पाकिस्तानचे चाहते खूप खुश आहेत. यावरुन आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan) पाकिस्तानला चिमटा काढला आहे. पाकिस्तानच्या या विजयानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफानने या सामन्यानंतर एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये स्तुती नव्हे तर छुपा टोमणा मारताना चिमटा देखील काढला आहे. त्याने लिहिले, ”शेजाऱ्यांचे विजय येत-जात राहतात पण ग्रेस (चॅम्पियनच्या शैलीत खेळ दाखवणे) ही त्यांच्या आवाक्यातील गोष्ट नाही.”
मात्र भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan) एक ट्विट केले जे पाकिस्तानचा माजी खेळाडू इम्रान नाझीरला (Imran Nazir) खटकले आहे. एकिकडे पाकिस्तानने फायनलमध्ये धडक मारली अन् पठाण आणि नाझीर यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.
इरफान पठाण आणि इम्रान नझीर यांचे ट्विट
इरफान पठाणनने (Irfan Pathan) पाकिस्तानच्या विजयानंतर एक ट्विट करून शेजाऱ्यांच्या चाहत्यांना डिवचले असून, "शेजाऱ्यांचा विजय तर होत राहतो पण ही तुमची गोष्ट नाही आहे." असे माजी गोलंदाजाने ट्विट करत म्हटले आहे.
Padosiyon jeet ati jaati rehti hai, lekin GRACE apke bas ki baat nahi hai.
— Irfan Pathan (@IrfanPathan) November 9, 2022
यानंतर इरफान पठाणने आणखी एक ट्विट केले आणि लिहिले की, हे खेळाडूंसाठी अजिबात नाही. अर्थात त्याचे हे हावभाव शेजारी देशातील चाहत्यांसाठी असल्याचे त्याने स्पष्ट केले. मात्र पाकिस्तानी संघाचा माजी सलामीवीर इम्रान नाझीरला पठाणचे ट्विट आवडले नाही आणि प्रत्युत्तर देताना म्हटले, "अशा पद्धतीचे ट्विट पाहून दु:ख होत आहे."
Padosiyon jeet ati jaati rehti hai, lekin GRACE apke bas ki baat nahi hai.
— Irfan Pathan (@IrfanPathan) November 9, 2022
नाझीरने केलेल्या ट्विटला इरफान पठाणने देखील उत्तर दिले. यावर इरफान पठाणने इम्रान नजीरला जबरदस्त उत्तर दिले. दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने लिहले, "विजयानंतर मैदानात काही पाकिस्तानी चाहत्यांची वृत्ती पाहून तुलाही खूप वाईट वाटले असेल."
वाचा : कशी ओळखाल तुम्ही खाताय ती मॅगी की खोटी.... आताच पाहा
बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तान संघाने बाजी मारत अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डॅरेल मिशेलच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाला 4 गडी गमावून 152 धावा करता आल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर पाकिस्तानने सहज विजयाची नोंद केली. संघाने 19.1 षटकात 3 गडी गमावून विजय मिळवला. यामध्ये बाबरने 52 तर रिझवानने 57 धावा केल्या.