T20 World Cup 2022, IND vs SA : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 विश्वचषक (t20 world cup) स्पर्धेत आता पाकिस्तान संघाचे पुढचे भवितव्य एका अवघड वळणावर येऊन थांबले आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेतील गट दोनमध्ये पाकिस्तानने भारत आणि झिम्बाब्वेकडून (India and Zimbabwe) पहिले दोन सामने गमावले आहेत. पहिल्याच सामन्यात भारतीय संघाकडून निसटता का होईना परंतु अत्यंत मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर झिंबाब्वे सारख्या कमकुवत संघासमोर देखील पाकिस्तान संघाची अवस्था तशीच झाली आणि लागोपाठ दुसरा पराभव त्यांना स्वीकारावा लागला. (t20 world cup 2022 India vs South Africa Pakistan's focus on the match )
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ (Harris Rauff) याने पाकिस्तान टी-20 विश्वात पुनरागमन करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान रविवारच्या नेदरलँड्सविरुद्धच्या (Netherlands) सामन्यापूर्वी रौफ म्हणाले की, पाकिस्तानने सलामीचा सामना गमावला असला तरी त्यांची मोहीम संपली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही कोणत्याही संघाला कमी लेखू शकत नाही. प्रत्येक संघ येथे जिंकण्यासाठी आला आहे. झिम्बाब्वेने आमच्यापेक्षा चांगला खेळ केला आणि विजय मिळवला. हॅरिस रौफने मान्य केले की पाकिस्तानला (pakistan) हवी तशी सुरुवात करता आली नाही पण शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्ही सामने जिंकण्याचा प्रयत्न केला. हॅरिस रौफ म्हणाले की, आम्हालाही दु:ख झाले आहे. मात्र आम्ही अद्याप स्पर्धेतून बाहेर पडलेलो नाही. आम्ही अजूनही परत येऊ शकतो. आमच्याकडे तीन सामने खेळायचे आहेत आणि आम्ही त्यात चांगली कामगिरी करू.
आता पाकिस्तानचे काय होणार?
ग्रुप-2 च्या सुपर 12 सामन्यात भारत आणि झिम्बाब्वे (India and Zimbabwe) यांच्याकडून पहिले दोन सामने गमावल्यानंतर पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचा रस्ता कठीण झाला आहे. गट दोनमध्ये पाकिस्तान सध्या पाचव्या तर भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारत, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि झिम्बाब्वे पाकिस्तानच्या पुढे आहेत. जर पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल, तर त्याला उर्वरित तीन सामने जिंकावेच लागतील तर बाकीच्या संघांच्या विजय-पराजयावरही अवलंबून असेल. रविवारी म्हणजेच 30 ऑक्टोबरला पाकिस्तानची नेदरलँडशी टक्कर होणार आहे. 3 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेसोबत आणि 6 नोव्हेंबरला बांगलादेशसोबत सामना रंगणार आहे.
रविवारी पाकिस्तानने नेदरलँड्सचा पराभव केल्यास ते उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहतील. दोन्ही संघांनी पहिले दोन सामने गमावले असून गुणतालिकेत ते शून्यावर आहेत. 2009 च्या T20 विश्वचषकात दोन्ही संघ आमनेसामने आले होते तेव्हा पाकिस्तानने नेदरलँड्सचा 82 धावांनी पराभव केला होता. ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीची अवस्था हीच पाकिस्तानच्या फलंदाजांची खरी कसोटी आहे. मात्र, शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचे फलंदाज खूप दडपणाखाली होते आणि झिम्बाब्वेचे गोलंदाज त्यांच्यावर जबरदस्त माज करत होते.
झिम्बाब्वेने पाकिस्तानला 131 धावांचे लक्ष्यही गाठू दिले नाही. बाबर आझम (Babar Azam) एमसीजी अर्थात मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आणि पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर अपयशी ठरला. तर मोहम्मद रिझवानही निष्प्रभ ठरला आहे. हे दोन्ही खेळाडू पाकिस्तानचे सलामीवीर फलंदाज आहेत. मात्र, दोन्ही खेळाडू पुनरागमनाचा विश्वास व्यक्त करत आहेत.
हैदर अलीला (Haider Ali) संघात ठेवण्यावर पाकिस्तानचे चाहतेही प्रश्न उपस्थित करत आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर हैदर अलीच्या निवडीवर पाकिस्तानने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. शेवटच्या दोन सामन्यांमध्ये हैदर अली गरजेपोटी पाकिस्तानच्या कामी आला नाही. हॅरिस रौफ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि वसीम ज्युनियर यांनी पाकिस्तानची गोलंदाजी सुशोभित केली आहे. परंतु त्यांना अद्याप ठोस कामगिरी करता आलेली नाही.
वाचा : ये क्या हुआँ भाई! बांगलादेशचा संघ सामना जिंकलां पण शेवटचा चेंडूमुळे पुन्हा एकदा...
Ind vs SA सामना पाकिस्तानसाठी का महत्त्वाचा?
या दोन संघांपेक्षा भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील सामना पाकिस्तानसाठी महत्त्वाचा आहे. हा सामना आज पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावे अशी पाकिस्तानच्या जनतेची इच्छा आहे. केवळ दक्षिण आफ्रिकेनेच नाही तर उर्वरित तीनही सामने भारताने जिंकले. त्यामुळे पाकिस्तानचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
दक्षिण आफ्रिकेने भारताला हरवले तर पाकिस्तानचे उपांत्य फेरी गाठणे नगण्य होईल. भारत हरला तर दक्षिण आफ्रिकेचे पाच आणि भारताचे चार गुण होतील. दक्षिण आफ्रिका नेदरलँड्ससोबत खेळणार असून त्यांना हरवणे कठीण जाणार नाही. दुसरीकडे भारत बांगलादेश आणि झिम्बाब्वेला हरवू शकतो. दोन सामने जिंकून भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतासाठी उपांत्य फेरीचा मार्ग फारसा अवघड नाही. भारताचा धावगती +१.४२५ आहे, जो चांगला आहे.
वाचा : Rohit Sharma पर्थमध्ये इतिहास रचणार, ख्रिस गेलचा हा विक्रम मोडणार का?
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा रन रेट +5.200 असल्याने झिम्बाब्वेवर आधीच आघाडी आहे. दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी बांगलादेशवर 104 धावांनी विजय मिळवल्यामुळे ही आघाडी मिळाली. जर दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेने उर्वरित दोन सामने जिंकले तर पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
पाकिस्तानने उर्वरित तीनही सामने जिंकून सहा गुण मिळवले तरी त्यांना प्रतीक्षा करावी लागेल. भारताला दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरुद्धचे उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. याशिवाय झिम्बाब्वेला उर्वरित दोन सामने गमवावे लागणार आहेत. असे झाले तरच पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता येईल. एखाद्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तरी पाकिस्तानच्या आशा पल्लवित होतील.