मस्तच! मंकडिंग रनआउटपासून कसं वाचायचं, फिलिप्सने दिलं दाखवून Video व्हायरल!

काय सांगता! बॅट्समनची मंकडिंग रनआउट होण्याची चिंता मिटली? तुम्हीच पाहा व्हिडीओ

Updated: Oct 29, 2022, 08:55 PM IST
मस्तच! मंकडिंग रनआउटपासून कसं वाचायचं, फिलिप्सने दिलं दाखवून Video व्हायरल! title=

Sport News : टी-20 वर्ल्डकप सुरू होण्याआधी नवीन नियम करण्यात आले होते. त्यामध्ये मंकडिंगचाही समावेश करण्यात आला होता. नॉन स्ट्राईकर असलेला खेळाडू बॉल फेकण्याआधी पळाला अन् तितक्यात जर बॉलरने आउट केलं तर त्याला आपली विकेट गमवावी लागणार आहे. मात्र आज झालेल्या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या शतकवीर ग्लेन फिलिप्सने मंकडिंग रनआउटपासून कसं वाचायचं दाखवून दिलं आहे. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जगभरातील फलंदाजांनी फिलिप्सकडून हे शिकून घेतलं पाहिजे. फिलिप्स पळण्याच्या रेससाठी जसं बसतात तशा प्रकारे तो बसला आणि स्ट्राईकवर असलेल्या खेळाडून बॉल टोलावल्यावर सुसाट पळत गेला. फिलिप्स ज्या पद्धतीने बसला होता आणि बॉल गेल्यावर पळाला यावेळचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

 

ग्लेन फिलिप्सचे जगभरातून कौतुक होत आहे. गेल्या काही काळापासून मंकडिंगची बरीच चर्चा होत आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून, ICC ने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत, ज्यानंतर Mankading ला रनआउटच्या श्रेणीत टाकण्यात आले होते, पूर्वी ते Unfair Play च्या मानलं जात होतं.

दरम्यान, न्यूझीलंड आणि श्रीलंकेमधील सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाची अवस्था 15 वर 3 असताना संकटमोचक होत ग्लेन फिलिप्सने श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडून काढलं. 64 चेंडूमध्ये ग्लेनने 104 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 10 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार ठोकले. फिलिप्सने या खेळीसोबत टी-20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधित शतके मारणाऱ्या यादीत नंबर मिळवला आहे. न्यूझीलंडने हा सामना 65 धावांनी जिंकत त्यांच्या ग्रुपमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे.