मुंबई : टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup) दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 10 गडी राखून पराभूत झाल्यानंतर या स्पर्धेतील टीम इंडियाचा हा सलग दुसरा पराभव आहे. यासह टीम इंडियाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशाही कठीण झाल्या आहेत. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मोठे वक्तव्य केले आहे. ज्या वक्तव्यामुळे खूप खळबळ उडाली आहे.
न्यूझीलंडकडून आठ गडी राखून पराभूत झाल्यानंतर टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून टीम इंडिया बाद होण्याच्या मार्गावर. अशावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, त्यांचे खेळाडू बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये धैर्य दाखवू शकले नाहीत. सलग दुसऱ्या पराभवानंतर कोहली म्हणाला, 'हे खूप विचित्र आहे. सामन्यात गोलंदाज आणि फलंदाज दोघंही आपला उत्तम खेळ दाखवू शकले नाही. आम्ही फारशा धावा केल्या नाहीतच पण त्यासोबतच ते वाचवण्यासाठी देखील हिंमत दाखवली नाही. (IND vs NZ : Virat Kohli चा 'हा' निर्णय टीम इंडियासाठी ठरला घातक)
कोहली म्हणाला की, भारताकडून खेळताना अपेक्षांना सामोरे जावे लागेल. पुढे तो म्हणाला, 'जेव्हा तुम्ही भारतीय क्रिकेट संघाकडून खेळता तेव्हा चाहत्यांच्याच नव्हे तर खेळाडूंच्याही खूप अपेक्षा असतात. अपेक्षा नेहमीच असतात आणि आम्ही त्यांना इतक्या वर्षांपासून तोंड देत आहोत. भारताकडून खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला ते करावेच लागते. 'तुम्ही एक संघ म्हणून खेळता तेव्हा अपेक्षांचे कोणतेही दडपण नसते पण गेल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही तसे करू शकलो नाही.'
या वर्ल्ड कपनंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडलेल्या कोहलीने सांगितले की, 'तुम्ही भारतीय संघ आहात आणि तुमच्याकडून अपेक्षा आहेत, त्यामुळे तुम्ही वेगळे खेळू शकत नाही.' मात्र तो म्हणाला, 'आम्ही ठीक आहोत आणि आता भरपूर क्रिकेट खेळायचे आहे. भारतीय संघाला आता अफगाणिस्तान, नामिबिया, स्कॉटलंडशी खेळायचे आहे.