मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून यूएईच्या भूमीवर सुरू होत आहे. त्यामुळे टी -20 वर्ल्ड कपसाठी खूप कमी वेळ बाकी आहे, त्यामुळे अनेक देशांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. परंतु भारताने अद्याप आपल्या संघाची घोषणा केले नाही. निवडकर्त्यांना टी -20 वर्ल्ड कपसाठी एक मजबूत संघ मैदानात उतरवायचा आहे, जे आपल्या दमदार खेळामुळे हा सामना जिंकू शकतील.
BCCIला टी -20 वर्ल्ड कपसाठी संघ उभा करायचा आहे, तो स्फोटक फलंदाजांनी भरलेला आणि ज्यांच्याकडे सामना फिरवण्याची ताकद आहे. त्यामुळे अशा 4 खेळाडूंची नावे समोर आली आहेत. ज्यांना पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपसाठी तिकीट मिळू शकते. ती संभाव्य नावे कोणती आहेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
टी -20 वर्ल्ड कपच्या संघात निवड समिती पृथ्वी शॉला सलामीवीर म्हणून संधी देऊ शकते. परंतु पृथ्वी शॉमुळे सलामी वीर शिखर धवनचा पत्ता या संघातून कट होऊ शकतो. शिखर धवनचा 20-20 मधील स्ट्राईक रेट फारसा विशेष नव्हता. तर दुसरीकडे पृथ्वी शॉ ची बॅट हल्लाबोल करत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघात पृथ्वी शॉला सलामीवीर म्हणून टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार मानले जाते.
टी -20 विश्वचषक संघाबद्दल बोलायचे झाले, तर रोहित शर्माचे भारतीय संघातील स्थान पूर्णपणे निश्चित झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिखर धवन रोहित बरोबर सामन्यात उतरुन त्याला बळ देत आहे. परंतु पृथ्वी शॉने आता शिखर धवनच्या अडचणी वाढवल्या आहेत.
पृथ्वी शॉने शिखर धवनसाठी डोकेदुखीचे काम केले आहे. पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खराब कामगिरीनंतर विजय हजारे ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. एक प्रकारे, त्याने आपल्या निर्भय फलंदाजीने आपला दावा बऱ्यापैकी मजबूत करून धवनचे स्थान धोक्यात आणले आहे.
टी -20 विश्वचषकाच्या संघात, फलंदाज सूर्यकुमार यादवचे स्थान निश्चित असल्याचे मानले जाते. टी -20 वर्ल्ड कप संघात सूर्यकुमार यादव 5 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी प्रबळ दावेदार मानला जातो. सूर्यकुमार यादव सारख्या प्रतिभावान फलंदाजाला मैदानात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे अनेक फटके खेळण्याची आणि धावा काढण्याची कला अवगत आहे.
जर सूर्यकुमार यादव टी -20 वर्ल्ड कप संघात 5 व्या क्रमांकावर खेळला, तर श्रेयस अय्यरचे स्थान धोक्यात येऊ शकते. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे.
चेतन सकारियाला टी -20 वर्ल्ड कप संघात संधी दिली जाऊ शकते. चेतन सकारियामध्ये चेंडू दोन्ही प्रकारे स्विंग करण्याची क्षमता आहे. अशा परिस्थितीत हा गोलंदाज भुवनेश्वर कुमारची जागा टी -20 वर्ल्ड कप संघात घेऊ शकतो. आयपीएल 2021 मध्ये चांगल्या कामगिरीनंतर चेतन सकारियाला भारतीय संघात स्थान मिळाले.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाला त्याच्या वडिलांनी ऑटो रिक्षा चालवून खेळाडू बनवले.
वरुण चक्रवर्तीला टी -20 वर्ल्ड कप संघात संधी मिळू शकते. भारताकडे वरुण चक्रवर्तीच्या रुपात एक मिस्ट्री स्पिनर आहे, जो टी -20 वर्ल्ड कपतून युझवेंद्र चहलचा पत्ता कापू शकतो. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती सात प्रकारे गोलंदाजी करू शकतो. यामध्ये ऑफब्रेक, लेगब्रेक, गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर, टॉपस्पिन, पायांच्या बोटेवर यॉर्कर यांचा समावेश आहे. वरुण चक्रवर्ती टी -20 वर्ल्ड कप स्पर्धेत विरोधी संघांसाठी घातक ठरू शकतो.
त्यामुळे आता टी -20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी भारतीय संघात कोणाची वर्णी लागतेय हे पाहणं सगळ्यांसाठीच एक मिस्ट्री आहे आणि संपूर्ण देशाचं लक्ष याकडे लागून राहिले आहे.