T20 WC : रातोरात व्हायरल झालेली मिस्ट्री गर्ल पुन्हा दिसली; म्हणाली, 'अल्लाह भारताला...'

पाकिस्तानच्या विजयानंतर ही मिस्ट्री गर्ल चर्चेत आली होती

Updated: Nov 10, 2022, 01:26 PM IST
T20 WC : रातोरात व्हायरल झालेली मिस्ट्री गर्ल पुन्हा दिसली; म्हणाली, 'अल्लाह भारताला...' title=

T20 World Cup : संघाच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने (Pakistan) 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या (t20 world cup 2022) अंतिम फेरीत बुधवारी धडक मारली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा (pak vs nz) 7 गडी राखून पराभव केला. उपांत्य फेरीपासूनही दूर असलेल्या पाकिस्तनाच्या संघाने थेट फायनलमध्ये धडक मारल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. यामुळे पाकिस्तानाच्या संघासोबत त्यांच्या चाहत्यांचाही उत्साह दुणावला आहे. याचीच झलक कालच्या सामन्यात पाहायला मिळाली. 

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या खेळीने त्यांच्या चाहत्यांना धक्काच दिला. त्यामुळे पाकिस्तानातील क्रिकेट प्रेमींचा आनंद गगनात मानवला नाही. यावेळी सामना कव्हर करणाऱ्या एका कॅमेरामनने एका पाकिस्तानी चाहतीकडे (Mystery Girl) कॅमेरा फिरवला आणि ती तरुणी रातोरात सोशल मीडियावर तिचीच चर्चा सुरु झाली. यानंतर आता या चाहतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाकिस्तान संघ अंतिम फेरीत पोहोचताच व्हायरल झालेल्या पाकिस्तानी चाहतीने लोक तुमच्यावर टीका करतात, पण तुम्हाला परफॉर्मन्सवर लक्ष केंद्रित करावे लागेल, असे म्हटले. "आम्हाला फायनल मॅच भारतासोबत हवी आहे. आम्ही त्यांना जोरदार टक्कर देऊ इंशाअल्लाह, त्यांचा पराभव करू तुम्ही पाहा," असेही या चाहतीने म्हटलं आहे.  गोलंदाजीत कोण आवडते असे विचारले असता? तर चाहतीने नसीम शाह असे उत्तर दिले. संघात प्रत्येकजण खास आहे, तुम्ही कोणाचीही तुलना करू शकत नाही. आमच्यात नेहमीच जोश आहे, असे ही चाहती म्हणाली.

दरम्यान, न्यूझीलंडला नमवत पाकिस्तानी संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यानंतर आज भारताचा इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यात जिंकणारा संघ पाकिस्तानसोबत अंतिम सामना खेळेल.