टी20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी Good News, रवी, सूर्या जगातले नंबर वन खेळाडू

ICC T20 Rankings: आयसीसीने नवी टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारतीय खेळाडूंचा जलवा पाहिला मिळतोय. भारताचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई टी20 क्रिकेट जगतातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. रवीने दिग्गज गोलंदाज राशिद खानलाही मागे टाकलं आहे.   

राजीव कासले | Updated: Dec 6, 2023, 04:53 PM IST
टी20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियासाठी Good News, रवी, सूर्या जगातले नंबर वन खेळाडू title=

ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने 4-1 अशी मालिका आपल्या नावावर केली. या विजयाबरोबरच भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदलाही घेतला. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर आयसीसीने टी20 क्रमवारी (ICC T20 Ranking) जारी केली आहे, यात भारतीय खेळाडूंचा जलवा पाहिला मिळतोय.

भारतीय खेळाडूंचा जलवा
उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) टी20 क्रिकेट जगतातील नंबर वन गोलंदाज बनला आहे. रवी बिश्नोईने दिग्गज फिरकी गोलंदाज राशिद खानलाही (Rashid Khan) मागे टाकलं आहे. आयीसीसीने जाहीर केलेल्या नव्या टी0 क्रमवारीत भारताचा रवी बिश्नोई पहिल्या स्थानावर आहे. तर राशिद खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. आदिल राशिद आणि श्रीलंकेचा वानिंदु हसरंगा संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. श्रीलंकेचाचा महेश तिक्षणा पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. भारताचा ऑलराऊंडर अक्षर पटेलनेही 11 स्थानांची झेप घेत थेट 16 व्या स्थानावर मजल मारली आहे.  नुकत्याच झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेत रीव बिश्नोईने पाच सामन्यात नऊ विकेट घेतल्या. 

क्रमवारीत सूर्या तळपला
टी20 फलंदाजी क्रमवारीत मिस्टर 360 अर्थात सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत सुपरहिट ठरलेला मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाडने टॉप-10 मध्ये मजल मारली आहे. ऋतुराजने सातव्या क्रमांकावर आहे. तर भारतीय संघातील आक्रमक सलामीवीर यशस्वी जयस्वालने 16 स्थानांची झेप घेत 19 व्या स्थानावर मजल मारली आहे. हार्दिक पांड्या टी20 ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर कायम आहे. एकदिवसीय विश्वचषक  2023 स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो क्रिकेटपासून दूर आहे. 

ऋतुराज आणि रवीची दमदार कामगिरी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोई यांनी दमदार कामगिरी केली. मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऋतुराज गायकवाड पहिल्या क्रमांकावर होता. ऋतुराजने 5 सामन्यात 223 धावा केल्या. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. तर विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रवी बिश्नोई अव्वल स्थानावर होता. रवीने पाच सामन्यात 8.20 इकोनॉमी रेटने 9 विकेट घेतल्या. याच कामगिरीनच्या जोरावर तो प्लेअर ऑफ द सीरिजचा मानकरीही ठरला.

टी20 विश्वचषकात कोणाला संधी?
23 वर्षांच्या रवी बिश्नोई भारतासाठी आतापर्यंत एक एकदिवसीय आणि 21 टी20 सामने खेळला आहे. यात त्याने 34 विकेट घेतल्या आहते. आगामी टी20 विश्वचषक वेस्टइंडिज आणि अमेरिकेत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी रवी बिश्नोईला टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे. 

भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिका
• पहिला टी-20 सामना : भारताचा 2 विकेटने विजय
• दूसरा टी-20 सामना : भारताचा 44 धावांनी विजय
• तीसरा टी-20 सामना : ऑस्ट्रेलियाचा 5 विकेटने विजय
• चौथा टी-20 सामना : भारत 20 धावांनी विजय
• पाचवा टी-20 सामना : भारताचा सहा धावांनी विजय