दुबई : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2021 च्या अंतिम सामन्यात (ICC T 20 world Cup Final 2021) न्यूझीलंडला (New Zealand) पराभूत करत ऑस्ट्रेलिया (Australia) विश्व विजेता ठरला (World Cup 2021) आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाने हे विजयी आव्हान 18.5 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मिचेल मार्श आणि आणि डेव्हीड वॉर्नर हे ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे हिरो ठरले. मिचेल मार्शने नाबाद 77 धावा केल्या. तर डेव्हिड वॉर्नरने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टने 2 विकेट्स घेतल्या. (T 20 world Cup final 2021 australia beat new zealand by 8 wickets and win maidan title at dubai cricket stadium)
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : एरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्क्स स्टॉयनिस, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, एडम झॅम्पा आणि जोश हेझलवूड
न्यूझीलंडचे शिलेदार : केन विल्यमसन (कॅप्टन), मार्टिल गुप्टील, डेरील मिचेल, टीम सायफर्ट (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, जेम्स निशाम, मिचेल सँटनर, एडम मिल्न, टीम साऊथी, इश सोढी आणि ट्रेन्ट बोल्ट.