15 रुपये लीटर पेट्रोल 130 रुपये झालं, अनेक पंतप्रधानही बदलले, पण बदलला नाही 'हा' खेळाडू

टी 20 क्रिकेट स्पर्धेला (T 20 MENS WORLD CUP 2021) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे.  

Updated: Oct 12, 2021, 05:26 PM IST
15 रुपये लीटर पेट्रोल 130 रुपये झालं, अनेक पंतप्रधानही बदलले, पण बदलला नाही 'हा' खेळाडू title=

कराची : आगामी टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अनुभवी शोएब मलिकचा पाकिस्तान संघात समावेश करण्याची घोषणा केली आहे. पाक फलंदाज सोहैब मकसूद जखमी झाल्याने 39 वर्षीय शोएब मलिकची संघात वर्णी लागली आहे. टी20 विश्वचषकासाठी संघात शोएब मलिकची निवड न झाल्याने क्रिकेट चाहत्यांनी जोरदार टीका केली होती. (T 20 MENS WORLD CUP 2021 Pakistani tv channel trolled to senior cricketer shoaib malik)  
 
शोएब मलिकने 22 वर्षांच्या मोठ्या क्रिकेट कारकिर्दीत तब्बल 5 टी20 विश्वचषक स्पर्धेत खेळला आहे. 2007 मध्ये जेव्हा पहिली टी20 विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली. शोएब मलिक तेव्हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार होता.

पाकिस्तानने 2009 मध्ये टी20 विश्वचशक जिंकला. तेव्हा शोएब मलिक त्या संघाचा सदस्य होता. यानंतर 2012, 2014 आणि 2016 टी20 विश्वचषक स्पर्धेतही त्याने पाकिस्तान संघाचं प्रतिनिधित्व केलं.

1999 मध्ये एक दिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा शोएब मलिक आजही पाकिस्तान क्रिेकट संघाचा भाग आहे. 

त्याच्या या लांबलचक क्रिकेट कारकिर्दीबाबत पाकिस्तानमधल्या एका चॅनेलने केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. शोएब मलिकच्या पदार्पणापासून आतापर्यंत देशात आणि जगभरात काय-काय बदललं याबद्दल या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे. 

खूप बदल झाले, पण बदलला नाही तो...

जगभरात अनेक बदल झाले, पण अशी एक व्यक्ती आहे जी बदलली नाही, ती व्यक्ती आहे शोएब मलिक, परवेझ मुशर्फ यांच्याकडून सत्ता इम्रान खान यांच्या हातात आली. 

मोबाईल फोनचं युग अँड्रॉईडकडे वळलं, पण पाकिस्तानमध्ये एक गोष्ट कायम आहे, ती म्हणजे शोएब मलिक, जो 1999 पासून खेळत आहे.

व्हिडिओत म्हटलंय, 'नवाज शरीफ गेले, परवेज मुशर्रफ आले, त्यानंतर जरदारी, पुन्हा नवाज शरीफ आणि आता इमरान खान, पण शोएब मलिक बदलला नाही. शोएब मलिकने जेव्हा 22 वर्षांपूर्वी मैदानात एन्ट्री केली, तेव्हा इमरान खान यांनी पक्ष स्थापन केला. 

इमरान खान 22 वर्षांनंतर पंतप्रधान बनले. पण बदलला नाही शोएब मलिक. अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानान गेले, पुन्हा आले, तालिबान सत्ता आली, पण बदलला नाही शोएब मलिक.

1999 मध्ये पेट्रोलचे दर 15 रुपये लीटर होते, जे आता 130 रुपये आहेत, इंटरनेट आल्याने जगभरात अनेक गोष्टी बदलल्या, पण बदलला नाही तो शोएब. 

इतकंच नाही तर 21 वर्षांचा शाहीन अफरीदी, जो शोएब मलिकचा खेळ बघून लहानचा मोठा झाला, आणि आता शोएब बरोबरच पाकिस्तान संघातही खेळतोय, पण शोएब मलिक मात्र अजूनही क्रिझवर आहे.

शोएब मलिकची क्रिकेट कारकीर्द

शोएब मलिकने आतापर्यंत 116 आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये त्याने 124 च्या स्ट्राईक रेटने त्याने 6 हजार 559 धावा केल्या आहेत. 

टी20, एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात शोएबने पाकिस्तान क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं आहे. विशेष म्हणचे आपल्या क्रिकेट कारकिर्दीत शोएब मलिक तब्बल 15 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. शोएबने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती घेतली आहे.