मुंबई : कुस्तीपटू सुशील कुमार याचे नाव पद्मभूषण पुरस्कारासाठी विचारात घ्यावे याकरिता त्यांच्या कोचकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
२०११ साली सुशील कुमारला पद्मश्री मिळाला होता. त्यानंतर आता 'पद्मभूषण' पुरस्कारासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
Coach Yashveer has applied for Padma Bhushan award for me: Wrestler Sushil Kumar to ANI pic.twitter.com/esyQFKGnVC
— ANI (@ANI) September 26, 2017
२०१२ साली लंडन ऑलंपिकमध्ये रौप्य आणि २००८ साली बीजिंग ऑलंपिकमध्ये कास्य पदक मिळवणार्या सुशील कुमारला 'पद्मभूषण' मिळावा याकरिता त्याचे कोच यशवीर यांनी शिफारस केली आहे.
यंदा पद्मभूषण पुरस्कारासाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रिओ ऑलंपिकमध्ये चमकदार कामगिरी करणारी पी.व्ही सिंधू हिचे नावदेखील 'पद्मभूषण' पुरस्काराच्या यादीच्या स्पर्धेमध्ये आहे.