Suryakumar Yadav IND vs SL 3rd ODI: भारत विरुद्ध श्रीलंका (Ind vs SL ) संघात सध्या वनडे मालिका सुरू आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने श्रीलंकेचा 4 विकेट्सनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी विजय आघाडी घेतली. भारताने श्रीलंकेचे 216 धावांचे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. त्यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यातील शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. जर भारताने तिसरी वनडे मालिका जिंकली तर टीम इंडियाकडे क्लीन स्वीपची संधी असणार आहे. तर दुसरीकडे शेवटच्या वनडेसाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) स्टार सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) प्लेइंग 11 मध्ये संधी देणार का? हे ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, पहिल्या आणि दुसऱ्या वनडे सामन्यात चांगल्या लयीत असलेल्या सुर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी देण्यात आली नव्हती. त्याच्या ऐवजी गेल्यावर्षी वनडेत सरस कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) पसंती देण्यात आली होती. पण तिसऱ्या वनडे सामन्यासाठी सुर्यकुमारला आजमावू शकतात. तो सध्या दरदार फॉर्ममध्ये असून त्याने वनडे मालिकपूर्वी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत शतक झळकावले होते. त्याच्या जागी मधल्या फळीत श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) व केएल राहुल (KL Rahul) हे खेळताना दिसले. सूर्यकुमार याला संधी न मिळाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, सध्या भारतीय संघातील (team India) स्पर्धा पाहतात त्याला पुन्हा बाकावरच बसावे लागणार की काय?
वाचा : ठरलं तर! तिसऱ्या वनडे सामन्यात सुर्यकुमार यादव खेळणार
सध्या भारतीय संघात मधल्या फळीत खेळणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मागील वर्षी त्याने भारतासाठी सर्वाधिक धावा काढलेल्या. मागील दहा सामन्यात त्याने एक शतक व तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर त्यालाच अधिक संधी मिळेल. तर, पाचव्या क्रमांकावर खेळणारा केएल राहुल हा यष्टीरक्षक म्हणून भूमिका बजावतोय. त्याचा पर्याय सध्या तरी सूर्यकुमार यादव हा नाही. त्यामुळे टी20 क्रिकेटमध्ये अफलातून कामगिरी केली असली तरी, सूर्यकुमार याला वनडे संघामध्ये जागा मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये कर्णधार रोहितची पहिली पसंती श्रेयस अय्यर ठरला होता. पण या दोन्ही सामन्यात श्रेयस अय्यर अपयशी ठरला आहे. अशा परिस्थितीत शेवटच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादव प्लेइंग 11 चा भाग बनू शकतो. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.