Suryakumar Yadav IND vs SL 3rd ODI : श्रीलंकेविरूद्दची तीन सामन्याची वनडे मालिका टीम इंडियाने (Team India)2-0 ने खिशात घातली आहे.आता फक्त तिसरा सामना बाकी आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया श्रीलंकेवर (India vs Sri lanka) क्लीन स्वीप मिळवणार आहे.हा क्लीन स्वीप मिळवण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संघात संधी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संघातून डच्चू मिळणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Sri lanka)यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडिया (Team India)सध्या या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे शेवटच्या वनडेसाठी कर्णधार रोहित शर्मा स्टार सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) प्लेइंग 11 मध्ये स्थान देऊ शकतो, असे बोलले जात आहे. आतापर्यंत एकही सामना सुर्यकुमार यादव खेळू शकला नाही आहे. त्यामुळे तिसऱ्या वनडेत त्याला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माने श्रीलंकेविरूद्धच्या दोन्ही वनडे सामन्सासाठी श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer)संधी दिली होती. या संधीचे त्याला सोनं करता आले नसल्याचे त्याच्या खेळीतून दिसून येत आहे.कारण पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरने 24 चेंडूंचा सामना करताना केवळ 28 धावांचे योगदान दिले. या खेळीत श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer)केवळ 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याचवेळी, मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरने 33 चेंडूत 28 धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 5 चौकार आले. दोन्ही सामन्यातील ही खराब कामगिरी त्याला तिसऱ्या वनडे सामन्यातून बाहेरचा रस्ता दाखवू शकते.
श्रेयस अय्यरसाठी (Shreyas Iyer) 2022 हे वर्ष खुप चांगले गेले होते. या वर्षात त्याने 17 वनडेत 724 धावा केल्या होत्या. तसेच तो या वर्षी भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. श्रेयस अय्यरने टीम इंडियासाठी आतापर्यंत 7 कसोटी, 42 एकदिवसीय आणि 49 टी-20 सामने खेळले आहेत.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या खुप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकतेच टी20 त शतक ठोकले आहे. आता त्याला वनडेतही शतक ठोकण्याची संधी आहे. सु्र्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 16 एकदिवसीय आणि 45 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) 32 च्या सरासरीने 384 धावा आहेत, तर T20 मध्ये त्याने 3 शतकांसह 46.41 च्या सरासरीने 1578 धावा केल्या आहेत.
दरम्यान दोन्ही खेळाडूंचे आकडे पाहता वनडेमध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) एक चांगला खेळाडू म्हणून समोर आला आहे. त्याच तुलनेत सुर्याचे वनडेतील आकडे तितकेसे चांगले नाही आहेत. मात्र सध्याचा त्याचा फॉर्म पाहता सुर्याला फॉर्म मिळण्याची शक्यता आहे. आता त्याला संधी मिळते का, हे उद्या सामन्याच्या टॉसनंतरच कळणार आहे.