Ind vs Eng: वन डेतला 'सूर्य' इंग्लंडला इंग्लंडला तळपणार, BCCI कडून शिक्कामोर्तब

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या सीनियर टीममध्ये शुभमन गिल, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाल्याने तिघंही सीरिजमधून बाहेर आहेत.

Updated: Jul 26, 2021, 04:29 PM IST
Ind vs Eng: वन डेतला 'सूर्य' इंग्लंडला इंग्लंडला तळपणार, BCCI कडून शिक्कामोर्तब title=

मुंबई: मुंबईच्या दोन शिलेदारांना इंग्लंडमध्ये आपली कामगिरी करण्याची संधी मिळाली आहे. या दोघांच्या नावावर बीसीसीआयने शिक्कामोर्तब केलं आहे. पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव या दोघांच्या नावावर बीसीसीआयने शिक्कामोर्तब केला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ रवाना होणार आहेत.

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या सीनियर टीममध्ये शुभमन गिल, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापत झाल्याने तिघंही सीरिजमधून बाहेर आहेत. आवेश खानच्या बोटाला फ्रॅक्चर असल्याची माहिती मिळाली आहे. तर वॉशिंग्टन सुंदरलाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे दोघंही आता सीरिज खेळू शकणार नाहीत.

टीम इंडियाचा स्क्वाड

रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमान विहारी, ऋषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, के एल राहुल, ऋद्धिमान साह, अभिमन्यू इश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.

इंग्लंडने जाहीर केला आपला संघ

जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॉली, सॅम कुर्रान, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डॉम सिब्ले, बेन स्टोक्स , मार्क वुड. अशी 17 जणांची टीम जाहीर करण्यात आली आहे. 4 ऑगस्टपासून टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.