मुंबई: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळण्याची शक्यता आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळालेल्या महिलेची डोपिंग चाचणी होणार आहे. त्यामुळे आता भारताला सुवर्णपदक मिळू शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मीराबाई चानूला सिल्व्हर मेडल टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगसाठी मिळालं होतं. त्यानंतर भारतात तिचं खूप कौतुक झालं. इतकच नाही तर डॉमिनोजने तिच्यासाठी पिझ्झा नेहमी फ्री देणार अशी घोषणाही केली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये डोपिंगवरून वाद होण्याची चिन्हं आहेत.
मीराबाईचं सिल्वर मेडल गोल्डमध्ये बदलण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे मीराबाई चानू सोबत सुवर्णपदक मिळवणाऱ्या चीनी खेळाडूची होणार डोपिंग टेस्ट होणार आहे. 49 किलो वजनी गटात चानूनं एकूण 202 किलो वजन उचलून कामवलं रौप्य पदक मिळवलं होतं. चीनच्या झिहु हौ 210 किलो वजन उचलून ऑलिम्पिक रेकॉर्ड प्रस्थापित केला होता.
Tokyo Olympics: Weightlifter Hou to be tested by anti-doping authorities, silver medallist Chanu stands chance to get medal upgrade
Read @ANI Story | https://t.co/6dn9GPlA2e#OlympicGames #TokyoOlympics pic.twitter.com/dxJqZpxlux
— ANI Digital (@ani_digital) July 26, 2021
49 किलो वजनी गटातील गोल्ड मेडलिस्ट चीनच्या झिहु हौ हिची डोप टेस्ट होणार आहे. चीनची खेळाडू डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यास मीराबाई चानूला मिळणार सुवर्णपदक मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या डोपिंग टेस्टच्या निकालाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.