Sunil Gavaskar: रोहित शर्माचा फॉर्म सुधरेना, लिटिल मास्टर म्हणतात...

Sunil Gavaskar advised Rohit Sharma: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर (WTC 2023 Final) लक्ष केंद्रीत करण्यासाठी रोहित शर्माने आयपीएलमधून (IPL 2023) ब्रेक घ्यावा, असा सल्ला सुनील गावसकर यांनी दिला आहे.

Updated: Apr 27, 2023, 01:05 AM IST
Sunil Gavaskar: रोहित शर्माचा फॉर्म सुधरेना, लिटिल मास्टर म्हणतात... title=
Sunil Gavaskar advised Rohit Sharma

Sunil Gavaskar On Rohit Sharma: टीम इंडियाचा आणि मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. रोहित शर्माने आत्तापर्यंत जागतिक क्रिकेटमध्ये भरपूर नाव कमावलंय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रोहितला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. गेल्या काही सामन्यात त्याला शतक (Rohit Sharma Century) देखील झळकवता आलं नाही. त्यामुळे त्याचे चाहते नाराज आहेत. अशातच रोहितच्या खराब फॉर्मवर लिटिल मास्टर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

काय म्हणाले Sunil Gavaskar ?

रोहित शर्मा सध्या चिंतेत दिसत आहे. मला मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीच्या क्रमात काही बदल पाहायला आवडतील. खरं सांगायचं तर, मी असंही म्हणेन की रोहितनंही काही काळ विश्रांती घ्यावी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी (WTC Final 2023) स्वत:ला तंदुरुस्त ठेवावं. मुंबईच्या शेवटच्या काही सामन्यांसाठी तो पुन्हा पुनरागमन करू शकतो पण सध्या त्यानं स्वत:ला थोडी विश्रांती दिली पाहिजे, असं सुनील गावस्कर (Sunil Gavaskar On Rohit Sharma) यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा - WTC 2023 Final: Ajinkya Rahane ला संधी का मिळाली? Sunil Gavaskar यांनी कारण सांगत निवडली Playing XI

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS WTC Final) यांच्यात इंग्लंडच्या 'द ओव्हल' मैदानावर 7 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC 2023 Final) अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्यासाठी आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे संघ जाहीर झाले आहेत. त्यासाठी आता टीम इंडिया तयारी करताना दिसत आहे. त्यासाठी सुनील गावस्कर यांनी मोलाचा सल्ला दिलाय.  

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव यादव.

ऑस्ट्रेलियाचा संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर.