Struggle Story : क्रिकेटचा (Cricket) जन्म भारतात झाला नसला तरी आज क्रिकेट हीच भारताची ओळख बनला आहे. क्रिकेट म्हणजे भारतात धर्म बनला आहे. प्रत्येक पालक आपला मुलगा देशासाठी खेळावा याची स्वप्न बनतो. देशात स्थानिक क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धा (Ranji Trophy) ही मानाची समजली जाते. या स्पर्धेतूनच टीम इंडियाचे (Team India) दरवाजे उघडले जातात. याच रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत गेल्या तीन वर्षांपासून एक युवा फलंदाज धावांची बरसता करत आहे. स्वप्न फक्त एकच या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात संधी मिळेल. पण दमदार कामिगीरनंतरही बीसीसीआयकडून (BCCI) या खेळाडूकडे सातत्याने दुर्लक्षच होतंय.
रणजी ट्रॉफीतल्या रन मशिनीच कहाणी
रणजी ट्ऱॉफीत रन मशिन (Run Machine) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या युवा फलंदाजाचं नाव आहे सर्फराज खान (sarfaraz khan). रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत धावांचा ओघ असेल तर टीम इंडियात जागा मिळते असं आतापर्यंतचा अनुभव आहे. पण रणजी ट्रॉफीत मुंबईकडून खेळणारा (Mumbai Ranji Team) सर्फराज खान याला अपवाद आहे. रणजी स्पर्धेत धावांचा डोंगर रचूनही सर्फराजसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडलेले नाहीत. मुंबईकडून खेळताना सर्फराजने दिल्लीविरुद्ध शानदार शतक ठोकलं. रणजी ट्रॉफीतल्या 23 इनिंगमधलं हे त्याचं 10 वं शतक आहे. पण यानंतरही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात त्याला जागा मिळालेली नाही. (cricketer sarfaraz khan waiting for team india entry)
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रेकॉर्ड
सर्फराजने आतापर्यंत 36 फर्स्ट क्रिकेट सामान्यात 80 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. तब्बल 3380 धावा त्याच्या नावावर असून यात 12 शतकं आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे 301 नाबाद. धावा करण्याची त्याची क्षमता आणि संयम हा कसोटी क्रिकेटसाठी एकदम योग्य असल्याचं दिग्गज क्रिकेटरही मान्य करतात. 2009 मध्ये 12 वर्षांच्या सर्फराजने हॅरिस शील्ड ट्रॉफी स्पर्धेत 439 धावांची खेळी केली होती. याच खेळीमुळे तो रातोरात स्टार झाला होता. सर्वांची नजर मुंबईच्या या युवा फलंदाजांवर होती.
सातत्याने धावा करणाऱ्या सर्फराजने आपल्या कामगिरीच्या जोरावर 19 वर्षाखालील मुंबईत संघात संधी मिळाली आणि बघता-बघता भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघापर्यंत त्याने धडक मारली.
सर्फराजच्या वडिलांचा संघर्ष
सर्फराजचे वडिल नौशाद खान (Naushad Khan) मुंबईचे प्रसिद्ध क्रिकेटर होते. त्यांनी स्थानिक सामन्यात अनेक चांगल्या खेळी केल्या. पण रणजी ट्रॉफी स्पर्धेपर्यंत तो पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे आपल्या मुलाने हे आपलं स्वप्न पूर्ण करावं यासाठी त्यांनी सर्फराजवर अथक मेहनत घेतली. नौशाद खान यांनी स्वत: सर्फराजला क्रिकेटचं मार्गदर्शन केलं. नौशाद खान यांची मुंबईत क्रिकेट अकॅडमी आहे. यात सर्फराजशिवाय कामरान खान, इक्बाल अब्दुल्ला असे दर्जेदार क्रिकेटपटू घडले.
आयपीएलमध्ये दमदार कामगिरी
सर्फराज खाने आयपीएलमध्येही आपल्या दमदार कामगिरीची छाप उमटवली आहे. अवघ्या 17 व्या वर्षात तो रॉयल चॅलेंजर बंगळुरुसाठी खेळला. आयपीएलमधला तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला होता. पहिल्याच सामन्यात त्याने 7 चेंडूत 11 धावा केल्या होत्या. पण पुढच्याच सामन्यात त्याने 21 चेंडूत 45 धावा करत आपलं महत्व पटवून दिलं होतं. आता सर्फराज दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. पण आजही त्याला टीम इंडियात संधी मिळण्याची प्रतीक्षा आहे.
रणजीत शेवटच्या पाच सामन्यातील कामगिरी
दिल्ली विरुद्ध - नाबाद 117 धावा
आसाम विरुद्ध - नाबाद 28 धावा
तामिळनाडू विरुद्ध - 162 आणि नाबाद 15 धावा
सौराष्ट्र विरुद्ध - 75, 20
हैदराबाद विरुद्ध - 126