Arjun Tendulkar Bowling : रणजी ट्रॉफी 2022-23 च्या सिझनमध्ये भारतीय युवा खेळाडू चांगली कामगिरी करताना दिसतायत. ज्यामध्ये एक नाव आहे ते माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) मुलाचं म्हणडेच अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) चं. मुंबईच्या टीममध्ये स्थान मिळालं नाही म्हणून अर्जुनने गोव्याच्या टीमची वाट धरली. गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीपासून अर्जुनची कामगिरी चांगली होताना दिसतेय. अशातच अर्जुनने पुन्हा एकदा आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. 17 जानेवारीपासून गोवा विरूद्ध सर्विसेस (Goa vs Services) यांच्यात सामना सुरु झालाय. यामध्ये अर्जुनने सर्विसेसच्या फलंदाजांची दाणादाण उडवून दिली आहे.
रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) शतक झळकावलं होतं. त्यानंतर गोलंदाजीतही त्याने त्याची किमया दाखवली होती. तर आज गोवा विरूद्ध सर्विसेज यांच्यामध्ये सामना सुरु झाला असून अर्जुनने त्याच्या भेदक गोलंदाजीने विरोधी टीमच्या फलंदाजांच्या नाकीनऊ आणल्या.
पहिल्या डावात अर्जुनने 13 ओव्हरमध्ये सर्वात कमी 2.08 च्या इकोनॉमीने रन दिले. ज्यामध्ये त्याला 2 विकेट्स देखील पटकावले. याशिवाय लक्ष्य गर्ग आणि सुयश प्रभुदेसाई यांनाही 1-1 विकेट मिळवण्यात यश आलं आहे. मात्र त्यांची इकोनॉमी 3 पेक्षा जास्त होती. सर्विसेस टीमच्या रवी चौहान आणि कर्णधार रजत पालिवाल यांची विकेट मिळाली.
जर अर्जुनची कामगिरी अशीच राहिली तर त्याला आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेली मुंबई इंडियन्स या टीमकडून खेळताना दिसणार आहे. गेल्या 3 वर्षांपासून अर्जुन या टीमसोबत आहे. मात्र आतापर्यंत त्याला एकदाही प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाहीये. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जर अर्जुनचा फॉर्म असाच राहिला तर त्याला मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये संधी मिळणू शकते.
गोव्याकडून पदार्पण करताना अर्जुनने 179 चेंडूत शानदार शतक पुर्ण केले. गोवा विरूद्ध राजस्थानच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुन तेंडुलकरने शानदार फलंदाजी करत विरोधी संघाला रोखून धरले. अर्जुन तेंडुलकरने 178 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केलं होतं.
गेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने यॉर्कर बॉल टाकत झारखंडच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. या सामन्यामध्ये अर्जुनच्या गोलंदाजीवर खेळणं फलंदाजांना सोप्पं गेलं नाही. तर अर्जुनने एका यॉर्कर बॉलवर शाहबाज नदीमला थेट क्लिन बोल्ड केलंय. हा यॉर्कर बॉलला नदीमला खेळताच आला नाही.
शाहबाज नदीम फलंदाजी करत असताना अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी करत होता. यावेळी अर्जुनने एक यॉर्कर फेकला, जो बॉल नदीमला समजलाच नाही आणि तो विकेट गमावून बसला. विकेट मिळाल्यानंतर अर्जुनने सेलिब्रेशन देखील केलं. अर्जुनने 26 ओव्हरमध्ये 3.46 च्या इकोनॉमीने गोलंदाजी करत एक विकेट घेतली.