श्रीलंकेने चांगली कामगिरी केली - कोहली

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काल भारताला श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३२१ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हे आव्हान श्रीलंकेने तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

Updated: Jun 9, 2017, 09:06 AM IST
श्रीलंकेने चांगली कामगिरी केली - कोहली title=

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काल भारताला श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३२१ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हे आव्हान श्रीलंकेने तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

या पराभवानंतर विराट म्हणाला, आम्हाला वाटले होते की आम्ही चांगल्या धावा केल्यात. मला गोलंदाजांवर विश्वास होता मात्र श्रीलंकेने चांगला खेळ केला. 

संपूर्ण सामन्यात श्रीलंकेने लय कायम राखली आणि रणनीतीनुसार ते खेळले. आमची गोलंदाजी खराब झाली नाही मात्र आम्ही रणनीतीनुसार खेळलो नाही. त्यामुळे विजयाचे श्रेय श्रीलंकेला दिले पाहिजे, असे पुढे कोहली म्हणाला.