पॅरिस : आज फ्रेंच ओपनच्या सेमी फायनलमध्ये ब्रिटनचा अव्वल सीडेड अँडी मरे आणि स्वित्झर्लंडचा स्टॅनलिस वावारिंका यांच्यात लढत होणार आहे. तर दुसरीकडे क्ले कोर्टचा बादशाह राफेल नदाल आणि ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिईम हे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत...
क्वार्टर फायनलमध्ये मरेनं निशीकोरीला पराभवाची चव चाखायला लावली तर वावारिंकानं मरिन चिलीचचं आव्हान मोडून काढलं. नदालसमोरचा प्रतिस्पर्धी सामन्यात स्पेनचा पाबेला कार्नेवो बुस्टा अनफिट झाल्यानं नादालने सेमी फायनल प्रवेश केला होता.
डॉमिनिक थिईमनं फॉर्मात असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा सरळ तीन सेट्समध्ये पराभव करत सेमी फायनलचे तिकीट पटकावले होते. त्यामुळं नादाल-थिईम ही सेमी फायनल रंगतदार होणार अशी टेनिसप्रेमींना आशा आहे.