चांगल्या सुरुवातीनंतरही श्रीलंकेची दाणादाण

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये चांगल्या सुरुवातीनंतरही श्रीलंकेची दाणादाण उडाली आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 4, 2017, 04:51 PM IST
चांगल्या सुरुवातीनंतरही श्रीलंकेची दाणादाण  title=

दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये चांगल्या सुरुवातीनंतरही श्रीलंकेची दाणादाण उडाली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर श्रीलंकेनं 9 विकेटच्या मोबदल्यात 356 रन्स केल्या आहेत.

मॅथ्यूज-चंडीमलचं शतक

तिसऱ्या दिवसाची सुरुवात 131/3 अशी करताना मॅथ्यूज आणि चंडीमलनं शानदार शतक करत श्रीलंकेचा डाव सावरला. मॅथ्यूजनं 111 रन्स केले तर चंडीमल नाबाद 147 रन्सवर खेळत आहे. मॅथ्यूज आणि चंडीमलमध्ये 181 रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशीप झाली.

अश्विननं घेतल्या सर्वाधिक विकेट्स

भारताकडून अश्विननं तीन तर जडेजा, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी दोन विकेट घेण्यात यश आलं. श्रीलंका अजूनही 180 रन्सनी पिछाडीवर आहे.