कोलंबो : टीम इंडियाची (Indian Team) युवा ब्रिगेड सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडियाच्या नेतृत्वाची संधी शिखर धवनकडे देण्यात आली आहे. या दौऱ्यात उभयसंघात वनडे आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी श्रीलंकेला मोठा झटका बसला आहे. श्रीलंकेच्या स्टार खेळाडूवर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 1 वर्षांची बंदी टाकण्यात आली आहे. (sri lanka cricket board bans Bhanuka Rajapaksha due to breaching players contract)
श्रीलंकेचा फलंदाज भनुका राजपक्षावर (Bhanuka Rajapaksha) एक वर्षांची बंदी घालण्यात आलीये. तसेच 3.71 लाखांचा दंडही ठोठावण्यात आलाय. मात्र, त्याला दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. याची कारवाई त्वरित प्रभावाने बंदी घातली जाणार नाही. येत्या काळात त्याची बंदी लागू होईल. यामुळे भानुका राजपक्षेला टीम इंडिया विरुद्धच्या मालिकेसाठी ट्रेनिंग स्कॅवडमध्ये स्थान देण्यात आलंय. तसेच त्याला या मालिकेतही घेतलं जाऊ शकतं.
नक्की कारवाई कशासाठी?
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ही कारवाई भनुकाने प्लेअर कॉन्ट्रेक्ट 2019-20 चं उल्लंघन केल्या प्रकरणी केली आहे. भनुकाने माध्यमांना अनेक इंटरव्ह्यू दिले. यामध्ये त्याने श्रीलंका क्रिकेट बोर्डावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भनुकाने त्याला संघातून वगळल्याप्रकरणी जाहीररित्या नाराजी व्यक्त केली होती. इंग्लंड दौऱ्यासाठीही संघात स्थान द्यायला हवं होतं, असं भनुकाचं म्हणंन होतं.
भनुकावर 2 वर्ष लक्ष
श्रीलंका क्रिकेट बोर्ड 2 वर्ष भनुकाच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. यादरम्यान भनुकाने प्रोटोकॉलचं उल्लंघन केल्यास त्याच्यावर 1 वर्षाची बंदी लागू होईल. श्रीलंकाने नुकताच इंग्लंड दौरा केला. या दौऱ्यात श्रीलंकेला टी 20 आणि वनडे सीरिजमध्ये पराभूत व्हावं लागलं. या दरम्यान श्रीलंकेच्या 3 खेळाडूंनी बायो बबलच्या नियमाचं उल्लंघन केलं. त्यामुळे त्या खेळाडूंना परत पाठवण्यात आलं. या खेळाडूंवरही कारवाई करण्यात येणार आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया
शिखर धवन (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट प्लेअर : ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरनजीत सिंग.