IND vs SL, Test Series 2022 | टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा

श्रीलंका क्रिकेट टीम सध्या भारत दौऱ्यावर ( Sri Lanka Tour India 2022) आहे. या दौऱ्यात श्रीलंका टीम इंडिया विरुद्ध टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.   

Updated: Feb 25, 2022, 06:57 PM IST
IND vs SL, Test Series 2022 | टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा title=
प्रातिनिधिक छायाचित्र

कोलंबो : श्रीलंका क्रिकेट टीम सध्या भारत दौऱ्यावर ( Sri Lanka Tour India 2022) आहे. या दौऱ्यात श्रीलंका टीम इंडिया विरुद्ध टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या आगामी कसोटी मालिकेसाठी श्रीलंकाने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या कसोटी मालिकेत दिमुथ करुणारत्नेच ( Dimuth Karunaratne) श्रीलंकेचे नेतृत्व करणार आहे. या 18 सदस्यीय संघात एंजलो मॅथ्यूज, लहिरू थिरिमनेसारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. (sri lanka announced 18 member squad against team india  upcoming 2 test match series)

या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 4 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा मोहालीमध्ये खेळवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे 12 मार्चपासून बंगळुरुत केलं गेलं आहे. 

श्रीलंकेला मोठा झटका

दरम्यान श्रीलंकेला मोठा झटका बसला आहे. दुखापतीमुळे श्रीलंकेच्या 2 खेळाडूंना टी 20 मालिकेला मुकावं लागलं आहे. युवा स्पीनर महीश थेक्षाना आणि ओपनर कुसल मेंडिस या दोघांनी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडावं लागलं आहे. या दोघांच्या जागी  निरोशन डिकवेला आणि धनंजया डी सिल्वा यांना संधी देण्यात आली आहे.

कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया :  रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, आर अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि मोहम्मद शमी. 

श्रीलंका टेस्ट टीम :  दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), पाठुम निस्संका, लाहिरू थिरिमाने, धनंजया डी सिल्वा (उपकर्णधार), कुसल मेंडिस (फिटनेस टेस्ट आवश्यक), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चांदिमल, चारिथ असलंका, निरोशन डिकवेला, चमिका करुणारत्ने, लाहिरु कुमार, सुरंगा लकमल, दुष्मंथा चमीरा, विश्वा फर्नांडो, जेफ्री वँडरसे, प्रवीण जयविक्रमे आणि लसिथ एम्बुल्डेनिया.