मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने गेल्या काही दिवसात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. टीम इंडियाने वेस्टइंडिजला पराभूत करत 100 वा टी 20 विजय साजरा केला. तसेच विंडिजला टी 20 सीरिजमध्ये क्लीन स्वीप दिली. यामुळे टीम इंडिया गेल्या 6 वर्षात पहिल्यांदा आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहचली. यानंतर आता टीम इंडियाने श्रीलंकेचा पहिल्या टी 20 सामन्यात शानदार विजय मिळवला. यासह टीमने चमकदार कामगिरी केली आहे. यासह रोहितसेनेने पाकिस्तानचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (ind vs sl 1st t20i team india beat sri lanka and win 10th consecutive t 20 matchs wins and break pakistan record consecutive 9 match win record)
श्रीलंका विरुद्धचा पहिला सामना जिंकत टीम इंडियाने सलग 10 टी 20 विजय साजरा केला. यासह पाकिस्तानला टीम इंडियाने मागे टाकलं. पाकिस्तानचा सलग 9 टी 20 सामने जिंकण्याचा विक्रम होता.
टीम इंडियाचा सलग 10 वा विजय
टीम इंडियाचा अखेरचा पराभव हा टी 20 वर्ल्ड कप 2021 मध्ये झाला होता. या स्पर्धेत न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत केलं होतं. मात्र यानंतर टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकले. टीम इंडियाने अफगाणिस्तान, स्कॉटलँड, नामिबियाला वर्ल्ड कपमध्ये पराभूत केलं होतं.
यानंतर न्यूझीलंडला 3-0 ने लोळवलं होतं. टीम इंडियाची विजयी घोडदौड कायम राहिली. न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर वेस्टइंडिजचा 3-0 ने सूपडा साफ केला. या विजयासह टीम इंडियाने सलग 9 सामने जिंकण्याच्या स्वत:च्याच विक्रमाची बरोबरी केली.
त्यानंतर आता श्रीलंकेला पराभूत करत टीम इंडियाने दहावा टी 20 विजय साजरा केला. टीम इंडियाने पहिल्यांदाच 10 टी 20 सामने जिंकण्याचा कारनामा केला. यासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
रोहित शर्माचं उल्लेखनीय नेतृत्व
रोहितने अवघ्या काही दिवसांआधी टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हाती घेतली. तेव्हापासून टीम इंडियाचा निर्धारित षटकांच्या सामन्यात एकदाही पराभव झालेला नाही.
रोहितने टी 20 वर्ल्ड कप 2021 नंतर कॅप्टन्सीची सूत्रं घेतली. तेव्हापासून रोहितने सलग 10 सामन्यात विजय मिळवून दिला आहे. यामध्ये न्यूझीलंडचा टी 20 मालिकेत 3-0 ने विजय, वेस्टइंडिजचा वनडे आणि टी 20 सीरिजमध्ये प्रत्येकी 3-0 ने क्लीन स्वीपचा समावेश आहे.