चेन्नई : बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल (IPL 2021) सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) ची सीईओ (CEO) काव्या मारनच्या रीएक्शनवर बरीच चर्चा होत आहे. सामन्यादरम्यान, काव्या मारनच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव (Reaction) पाहिले गेले, जे सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत, परंतु बुधवारी झालेल्या या मॅचमध्ये काव्या मारनशिवाय सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यादरम्यान एक नवीन मिस्ट्री गर्ल स्पॉट झाली आहे.
Feeling Sad For Them☹️#SRHvRCB #SRHvsRCB #RCBVsSRH #SRH #RCB #Warner #IPL2021 #ManishPandey @SunRisers pic.twitter.com/kXpysbQHoa
— Rajesh Singh Negi (@RajeshSN1999) April 14, 2021
ही नवीन मिस्ट्री गर्ल काव्या मारनसह सनरायझर्स हैदराबादला पाठिंबा देताना दिसली. सोशल मीडियावर खळबळ उडवणाऱ्या या नव्या मिस्ट्री गर्लबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. बुधवारी सनरायझर्स हैदराबादच्या बॅटिंगच्या वेळी 17 व्या ओव्हरमध्ये जॉनी बेस्टो, मनीष पांडे आणि अब्दुल समद यांच्या विकेट पडल्या, त्यामुळे या मुलीचा आणि काव्या मारनच्या चेहऱ्यावर निराशा आली. मॅच दरम्यान काव्याने दिलेल्या वेगवेगळ्या रीएक्शन बद्दलच सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
Kaviya Maran Reaction after #ManishPandey Wicket #SRHvsRCB #RcbvsSrh pic.twitter.com/TAsXApSP6c
— Raja VJ (@rajavjoff) April 14, 2021
बुधवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्सची टीम बॅटिंगसाठी आली आणि सनरायझर्स हैदराबादसमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर हैदराबादच्या टीमने २० ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 143 धावा केल्या आणि कोहलीच्या संघाने 6 धावांनी सामना जिंकला.
सनरायझर्स हैदराबाद (SRH)आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील सामना रोमांचक ठरला. यामध्ये विजयाकडे वाटचाल करणार्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.
Warner should open with Bairstow & also have to bring back Kane Williamson.
Manish Pandey & Vijay Shankar are very disappointing, instead chances should be given to youngsters like Garg & Abhishek.
.
CAN'T WATCH HER LIKE THIS AGAIN! #KaviyaMaran #SRHvRCB pic.twitter.com/ZWMbchuO2r— Nirmal Kumar (@nirmal_indian) April 14, 2021
17 व्या ओव्हरमध्ये शहबाज अहमदला बॅलिंगसाठी आणण्याचा निर्णय बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने घेतला. या ओव्हरमध्ये शाहबाज अहमदने हैदराबादचे बॅट्समॅन जॉनी बेस्टो, मनीष पांडे आणि अब्दुल समद यांच्या विकेट्स घेत बंगळुरूचा विजय निश्चित केला आहे.