दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या सहा वनडे मॅचच्या सीरिजला आजपासून सुरुवात होत आहे.

Updated: Feb 1, 2018, 04:16 PM IST
दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय  title=

डरबन : भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या सहा वनडे मॅचच्या सीरिजला आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. भारतानं टेस्ट सीरिज २-१नं गमावली असली तरी शेवटच्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला. यामुळे कोहली ब्रिगेडचा आत्मविश्वास वाढला असेल.

या खेळाडूंना संधी

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल