सौरव गांगुलीची बीसीसाआयच्या अध्यक्षपदी निवड होणार ?

बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठीचा प्रबळ दावेदार

Updated: Aug 12, 2018, 04:00 PM IST
सौरव गांगुलीची बीसीसाआयच्या अध्यक्षपदी निवड होणार ? title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीसीसाआयच्या अध्यक्षपदी निवड होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोढा समितीच्या काही शिफारशी सर्वोच्च न्यायालयानं बाजूला करत बीसीसीआयच्या नव्या घटनेतील काही मुद्य्यांना मंजूरी दिली आहे. बीसीसीआयचे माजी आणि विद्यमान अधिकारी कूलिंग ऑफ पिरियडमुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर दावा करु शकणार नाहीत. 

बंगाल क्रिकेट संघटनेत अध्यक्षस्थानी असलेला गांगुली या नियमांमध्ये बसणार असल्यानं तो बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठीचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. ४६ वर्षीय गांगुली मागची ४ वर्षे प्रशासनामध्ये कार्यरत असून यामुळे तो बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यास पुढील दोनच वर्षे तो या पदावर राहू शकतो. नव्या नियमानुसार एक व्यक्ती फक्त ६ वर्षे बीसीसीआयच्या प्रशासकीय पदावर काम करु शकतो. जर त्याला बीसीसीआयच्या अध्यक्षस्थानी विराजमान व्हायचं असेल तर त्याला बंगाल क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागेल.