IPL ऑक्शनमध्ये मुलगा झाला कोट्यधीश; तरीही वडिलांनी सोडली नाही सिक्युरीटी गार्डची नोकरी

भारतीय क्रिकेटर रॉबिन मिंज याचे वडिल फ्रांसिस जेवियर यांना खात्री होती की त्यांचा मुलगा ही एकदिवस भारतीय क्रिकेट टिमचा हिस्सा होणार, ज्यावेळेस त्यांनी भारतीय क्रिकेटर्सला एयरपोर्टवर बघितले.

Updated: Feb 23, 2024, 03:08 PM IST
IPL ऑक्शनमध्ये मुलगा झाला कोट्यधीश; तरीही वडिलांनी सोडली नाही सिक्युरीटी गार्डची नोकरी title=

IPL 2024: आयपीएलचा 17 वा सिझन येत्या मार्चपासून सुरु होणार आहे. सिझन सुरु होण्यापूर्वी आयपीएलचं ऑक्शन झालं होतं. ज्यामध्ये छोटे खेळाडू देखील मालामाल झाले. या ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सने 3.60 कोटींना रॉबिन मिंज या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतलं. रॉबिन मिंज हा आदिवासी खेळाडू आहे, जो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार आहे. आपल्या मुलाने इतक्या कोटींचा करार करूनही त्याचे वडील मात्र आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिक्यूरिटी गार्डची नोकरी करतायत.  

सध्या इंग्लंड विरूद्ध भारत यांच्यात टेस्ट सिरीज सुरु असून सिरीजमधील चौथा सामना रांचीमध्ये खेळवण्यात येतोय. यावेळी बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉबिन मिंजचे वडील सिक्युरिटी गार्डची नोकरी करत होते. यावेळी फ्रांसिस झेव्हियर ( रॉबिनचे वडील ) यांनी भारतीय क्रिकेट टीमला रांचीच्या विमानतळावर बघितले त्यावेळेस त्यांना विश्वास होता की, त्यांचा मुलगा रॉबिणसुद्धा एकेदिवशी या भारतीय क्रिकेट टिमचा हिस्सा होईल. 

रॉबिनच्या IPL करारानंतर काय झाला फ्रांसिस आणि त्यांच्या कुटूंबाच्या आयुष्यात बदल? 

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, रांचीमध्ये फ्रान्सिस म्हणाला, "मी प्रत्येकाला विमानतळाबाहेर येताना पाहतो, पण फार कमी लोकं माझ्याकडे लक्ष देतात. मी फक्त एक सुरक्षा अधिकारी आहे. रॉबिन हा पहिला आदिवासी क्रिकेटपटू आहे ज्याला आयपीएल करार मिळाला आहे. भलेही माझ्या मुलाला आयपीएल करार मिळाला असला तरी, भारतीय संघात सामील होण्याच्या दृष्टीने रॉबिनला अजूनही एक लांब प्रवास करावा लागणार आहे. रॉबिनने नुकताच सुरुवात जरी केली असली, तरी एवढ्या कमी वयात त्याने आपली ओळख जगाला दिली आहे." 

फ्रान्सिस झेव्हियर मिंज हे दोन दशकांपेक्षा जास्त काळ सैन्यात सेवा करून सुरक्षा रक्षकाची नोकरी करत होते. त्यांच्या मुलाला आयपीएल करार मिळाल्यानंतरही आर्थिक फायद्यांना बळी न पडता त्यांनी नोकरी सोडण्याचा काहीही विचार केलेला नाही.

फ्रान्सिस म्हणाले, "माझा मुलगा आयपीएल क्रिकेटर बनल्यामुळे मी आराम करू शकत नाही. खरं तर, कुटुंबात आर्थिक सुरक्षितता वाढली आहे, पण आयुष्य कशाप्रकारचे असेल हे सांगता येत नाही. माझे अनेक सहकारी मला विचारतात की, आता मला काम करण्याची आवश्यकता का आहे? पण मी त्यांना सांगितले की जोपर्यंत माझी इच्छा आहे आणि मी तंदुरुस्त आहे तोपर्यंत मी काम करत राहीन. जर मी स्वत:साठी काही कमावले नाही तर मला झोपही येत नाही.

रॉबिनचं कुटुंब अजूनही त्याच घरात राहतात. रॉबिनच्या जीवनशैलीत देखील काही फरक पडलेला नाही. ते म्हणाले, "आम्ही अजूनही जुन्या घरातच राहतो. मी अजूनही तीच बाईक चालवतो आणि ही जीवनशैली मी अशीच ठेवणार आहे. सुदैवाने रॉबिनसुद्धा तसाच राहिला आहे, रॉबिनला माहिती आहे की, त्याला अजून कठोर परिश्रम करावी लागणार आहेत."

फ्रान्सिस हे आपल्या मुलाच्या क्रिकेट प्रवासात भारताच्या माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या भूमिकेबद्दलही बोलले. आयपीएल लिलावाच्या काही दिवसानंतर, फ्रान्सिस म्हणाले, धोनीने त्याला वचन दिलं होतं की जर लिलावादरम्यान कोणी रॉबिनसाठी बोली लावली नाही तर सीएसके त्याच्यासाठी बोली लावेल.