T20 World Cup : हे माँ.. माताजी... टीम इंडियाच्या पराभवानंतर स्मृती इराणी यांना का आठवली दयाबेन

टीम इंडियाच्या पराभवानंतर सेलिब्रेटींची सोशल मीडियावर पोस्ट, स्मृती इराणी यांची पोस्ट होतेय व्हायरल

Updated: Nov 10, 2022, 08:39 PM IST
T20 World Cup : हे माँ.. माताजी... टीम इंडियाच्या पराभवानंतर स्मृती इराणी यांना का आठवली दयाबेन title=

Smriti Irani Reaction : टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाचा (Team India) लाजीरवाणा पराभव झाला. टीम इंडियाच्या पराभवाचं प्रत्येक भारतीयाला दु:ख झालं. करोडो क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पराभवामुळे भारताचं फायनल गाठण्याचं स्वप्न भंगलंय. सोशल मीडियावरही याच्या प्रतिक्रिया पाहिला मिळतायत. (England Beat India)

स्मृती इरानी यांची प्रतिक्रिया
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनीही सोशल मीडियावर (Social Media) प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची इंस्टा पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर स्मृती इराणी यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील दयाबेनचा (Dayaben) व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओबरोबर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, कोणीतरी चुकून तुम्हाला विचारले की स्कोअर काय आहे? #मतपूछो #atyachar #t20worldcup. टीम इंडियाच्या पराभवामुळे स्मृती इराणी यांनाही प्रचंड दु:ख झालंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial)

स्मृती इराणी यांच्याबरोबर अनेक सेलिब्रेटींनी टीम इंडियाच्या पराभवावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता अजय देवगनने (Ajay Devgan) टीम इंडियाच्या प्रयत्नांना सलाम केला आहे. त्याच्यामते खेळात हार-जीत होत असते. शेवटी खेळ महत्त्वाचा असतो असं देवगन याने म्हटलं आहे. याशिवाय अली गोनी, राहुल वैद्य, नकुल मेहता यांनीही आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 169 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हार्दिक पांड्या आणि विराट कोहलीच्या खेळीने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. पण यानंतरही भारताला विजय मिळवता आला नाही याचं दु:ख आहे. 

इंग्लंडने भारतावर 4 षटकं आणि 10 विकेटने मात केली. इंग्लंडने सुरुवातीपासूनच फटकेबाजी करत विजयाचा पाया रचला. जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्सने तुफान फटकेबाजी करत अवघ्या 16 व्या षटकातच इंग्लंडला शानदार विजय मिळवून दिला. आता फायनलमध्ये इंग्लंडची गाठ पाकिस्तानशी पडणार आहे. येत्या 10 नोव्हेंबरला फायनल रंगणार आहे.