Ind vs Eng : ज्याची भीती होती तेच झालं, टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण?

दमदार कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाच्या गाडीला सेमी फायनलमध्ये कसा लागला ब्रेक???  

Updated: Nov 10, 2022, 11:36 PM IST
Ind vs Eng : ज्याची भीती होती तेच झालं, टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण? title=

Ind vs Eng Semi Final T-20 World Cup : भारताचा आज इंग्लंडविरूद्धच्या सेमीफायनल सामन्यामध्ये पराभव झाला. या पराभवामुळे भारत स्पर्धेतून बाहेर पडला त्यामुळे वर्ल्ड कप जिंकण्याचं भारतीयांचं स्वप्न भंगलं. भारताचा आजचा पराभव झाला त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. (Ind vs Eng Semi Final Match)

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज कुठेही सांघिक कामगिरी पाहायला मिळाली नाही. तुम्ही याआधीचे सामने पाहिले तर लक्षात येईल की मुख्य कारण म्हणजे भारतीय संघाची बॅटिंग, कारण के. एल. राहुल आणि रोहित शर्मा या स्पर्धेत पुर्णपणे फ्लॉप झालेले दिसले. आजच्याही सामन्यात दोघांना एक मजबूत सलामी करून देता आली नाही. भारतीय संघाची बॅटिंगमध्ये पुर्णपणे विराट कोहली आणि सुर्यकुमारवर अवलंबून असलेली दिसली. आजच्या सामन्यात सूर्या अपयशी ठरल्यावर संघ दबावामध्ये खेळत होता. 

या स्पर्धेत एक सामना खेळलेल्या ऋषभला आजच्या सामन्यात संधी देण्यात आली. मात्र त्याला फार काही वेळ मिळाला नाही. वेगळं काही नाही आज फक्त हार्दिक पंड्याने अनपेक्षित अशी खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यास मोठं योगदान दिलं. टॉप ऑर्डर फ्लॉप त्यानंतर सुर्यकुमारचं लवकर बाद होणं त्यामुळे मोठी धावसंख्या  होणं अशक्यच, महत्त्वाचं म्हणजे आजही विराटने एक बाजू लावून धरली होती, अर्धशतक पुर्ण केलं.  

भारताच्या 169 धावांचं लक्ष्य फार काही मोठं नव्हतं, त्यामुळे गोलंदाजच काहीतरी जादू करतील अशी आशा सर्वांना होती. मात्र बटरल आणि हेल्सने भारताच्या वर्ल्ड कप जिंकण्याच्या स्वप्नाला सुरूंग लावला. स्विंगचा बादशहा म्हणून ओळख निर्माण केलेल्या भुवनेश्वरला पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार बसला त्यानंतर दोघांनी संघाला फायनलमध्ये नेण्यापर्यंत थांबण्याचं नाव घेतलं नाही. कारण संपूर्ण सामन्यात दोघांना आऊट करण्याचं उत्तर एकाही भारतीय गोलंदाजाकडे नव्हतं. 

रोहितने आपल्या भात्यातील सर्व अस्त्र वापरलीत मात्र आज एकालाही गडी बाद करण्यात यश आलं नाही. युवा गोलंदाज  अर्शदीप सिंहनेही त्याचा पूर्ण प्रयत्न केला  त्यासोबत मोहम्मद शमीनेही आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला परंतु दोघांनाही काही यश मिळालं नाही. गोलंदाजीमध्ये भुवी यंदाही जास्त प्रभावी दिसला नाही, महत्त्वाचं म्हणजे आर. आश्विनला इतकी संधी दिली मात्र त्यालाही अनुभवाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याच्यामुळे प्रतिभावान चतुर चालाक चहलला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. यावरूनही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 

या स्पर्धेत भारतीय संघाचे काही सामने अटीतटीचे राहिले, पाकिस्तान आणि बांगलादेशसोबतचे सामने तर भारताने हरता-हरता जिंकले होते. एक मात्र खरं आहे की, 2007 पहिल्यांदा धोनीच्या नेतृत्त्वात उंचावलेली ट्रॉफी या वर्षीही भारतीय संघ परत एकदा उंचावेल अशी आशा आणि स्पप्न सर्वांनी पाहिलं होतं, मात्र इंग्लंडने हे धुळीस मिळवलंय.