Shubman Gill: शुभमन से मॅच करा दो, Tinder ला विनंती करणाऱ्या तरूणीला अर्शदीपचं खणखणीत उत्तर, पाहा Video

Arshdeep singh Answer to Tinder Girl: बॉन्ड्री लाईनजवळ अनेक खेळाडू उभे होते. त्यावेळी अर्शदीपने (Arshdeep Singh) जे काही केलं, ते कॅमेऱ्यात कैद झालंय.

Updated: Feb 3, 2023, 06:33 PM IST
Shubman Gill: शुभमन से मॅच करा दो, Tinder ला विनंती करणाऱ्या तरूणीला अर्शदीपचं खणखणीत उत्तर, पाहा Video title=
Shubman Gill tinder

Shubman Gill, Tinder Girl: टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात गिलने शतक (Shubman Gill Century) झळकावलं आणि आगामी वर्ल्ड कप (2023 ODI World Cup) संघात दावेदारी ठोकली आहे. वनडे, टेस्ट क्रिकेट आणि टी-ट्वेंटी अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा शुभमन पाचवा खेळाडू ठरलाय. शुभमन सध्या क्रिकेटच्या मैदानावर चर्चेत आहे, त्याचबरोबर तो सोशल मीडियावर देखील पोरींच्यात भाडणं लावत असल्याचं पहायला मिळतंय. सारा अली खान (Sara Ali Khan) आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांच्यासोबतच्या त्याच्या कथित नातेसंबंधाच्या अफवा इंटरनेटवर फिरत असताना आता शुभमनवर आणखी एक तरुणी (Tinder Girl) घायाळ झाल्याचं दिसतंय. (Shubman Gill Fan Goes Viral For Holding Up Tinder Match Kara do Bizarre Request Arshdeep singh answer to girl watch video)

अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळल्या गेलेल्या सामन्यात एक तरुणी हातात बोर्ड घेऊन उभी होती. शुभमन से मॅच करा दो (Shubman se match kara do), अशी विनंती तिने डेटिंग साईट असलेल्या टिंडरला (Tinder) केली होती. तिचा हा फोटो सध्या चर्चेत आहे. कॅमेरामॅनने तरुणीला कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर सध्या सध्या तिची चर्चा होताना दिसते. एवढी चर्चा झाली की, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुमपर्यंत (Dressing Room) तरुणीची माहिती पोहोचली.

आणखी वाचा - Shubman Gill : विक्रमी खेळीनंतर शुभमन गिल Emotional, पोस्ट करत म्हणाला...

मॅच संपल्यानंतर जेव्हा गिलला प्लेअर ऑफ द मॅच (Player of the match) पुरस्कार देण्यात आला, त्यावेळी स्टेडियममध्ये बसलेले लोक महिला फॅनसोबत चिअर करायला लागले. त्यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंनी महिलेचा ठावठिकाणा लागला. त्यावेळी बॉन्ड्री लाईनजवळ अनेक खेळाडू उभे होते. त्यावेळी अर्शदीपने (Arshdeep Singh) जे काही केलं, ते कॅमेऱ्यात कैद झालंय.

पाहा Video - 

दरम्यान, अर्शदीपने हाताने क्रॉस करत तरुणीला नाही, असं उत्तर दिलं. त्यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये फक्त शुभमनची चर्चा होती, असं दिसून येतंय. त्यावेळी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), अर्शदीप सिंह (Arshdeep Singh), कुलदीप यादव (Kuldeep Yadav), युझी चहल (Yuzi Chahal) आणि आणखी टीमचे सहकारी उपस्थित असल्याचं दिसतंय.