मुंबई : यंदाच्या आयपीएल सिझनमधून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जनंतर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारी कोलकाता नाइट रायडर्स ही तिसरी टीम आहे. लखनऊ सुपर जाएंट्सविरूद्ध झालेल्या पराभवानंतर कोलकाताची टीमही प्लेऑफ गाठू शकणार नाहीये. दरम्यान यामुळे चाहते नाराज असताना कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
लखनऊविरूद्धच्या सामन्यानंतर, आपल्याला जराही दुःख झालं नसल्याचं श्रेयस अय्यरने सांगितलं आहे. सामना संपल्यानंतर बोलताना अय्यरने म्हटलं की, मला जराही वाईट वाटतं नाहीये. मी खेळलेल्या सर्वोत्तम क्रिकेट खेळांपैकी हा एक होता. रिंकूने ज्या प्रकारे आम्हाला खेळ केला तो मला खूप आवडला. पण दुर्दैवाने दोन चेंडू बाकी असताना तो सामना काढता आला नाही, तो खूप दुःखी होता.
मला आशा होती की तो सामना जिंकवून देईल. परंतु तसं झालं नाही, मात्र त्याने चांगली खेळी केली. मी त्याच्यासाठी खूप खूश आहे, असंही अय्यरने सांगितलं.
कोलकाता नाइट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जला हरवून IPL 2022 ला सुरुवात केली होती. श्रेयस अय्यरच्या कोलकाता नाईट रायडर्सने या सिझनमध्ये 14 सामने खेळले, ज्यात टीमने सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला आणि आठ सामन्यांमध्ये पराभव स्विकारला. दरम्यान अशा कामगिरीनंतरही कर्णधार श्रेयस अय्यर टीमच्या कामगिरीवर खूश आहे.
शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात लखनऊ सुपर जांयट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 2 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह लखनऊने प्लेऑफ फेरीत धडक मारली आहे. लखनऊ प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणारी दुसरी टीम ठरली आहे.