शॉर्ट रनचा वाद वाढला, चुकीच्या कॉल विरोधात पंजाबच्या खेळाडूंची अपील

 अंपायर नितीन मेनन यांच्या शॉर्ट रनच्या कॉल विरोधात अपील

Updated: Sep 21, 2020, 03:09 PM IST
शॉर्ट रनचा वाद वाढला, चुकीच्या कॉल विरोधात पंजाबच्या खेळाडूंची अपील   title=

दुबई : पंजाबच्या खेळाडूंनी दिल्लीच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात अंपायर नितीन मेनन यांच्या शॉर्ट रनच्या कॉल विरोधात अपील केलं आहे. तर माजी खेळाडू्ंनी देखील योग्य निर्णयासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करण्याची मागणी केली आहे.

सुपर ओव्हरच्या आधी  १९ व्या ओव्हरमधल्या तिसऱ्या बॉलवर क्रिस जॉर्डनच्या रनला अंपायरने शॉर्ट रन म्हणून कॉल दिला होता. पण टीव्ही स्क्रीननुसार त्याने रन पूर्ण केला होता. ज्यामुळे २ रन ऐवजी एकच रन दिला गेला. शेवटी एक रनने पंजाबचा विजय होता होता राहिला.

टेक्नोलॉजी असताना देखील त्याचा उपयोग न करता निर्णय ही बदलला गेला नाही. पण त्या एक रनचं महत्त्व सगळ्यांनाच माहित आहे.

पंजाबचे सीईओ सतीश मेनन यांनी म्हटलं की, आम्ही मॅच रेफरी यांना विनंती केली आहे की, माणसाकडून चुकी होऊ शकते. पण आयपीएल सारख्या आंतरराष्ट्रीय टुर्नामेंटमध्ये याला जागा नाही. एक रन देखील टीमला प्ले ऑफपासून लांब करु शकते.'

'शेवटी पराभव हा पराभव असतो. हे अयोग्य आहे. आशा आहे की, नियम पडताळले जातील. ज्यामुळे अशा चुका होणार नाहीत.'

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू टॉम मूडीने म्हटलं की, 'टेक्निकल मदत घेण्यासाठी नियमांमध्ये बदल केले पाहिजे. तिसऱ्या अंपायरकडे जायला पाहिजे होतं. पण नियम म्हणतो की, हा निर्णय टुर्नामेंट सुरु होण्याआधी घ्यायला पाहिजे होता.'

संजय मांजरेकर यांनी म्हटलं की, 'थर्ड अंपायरने दखल देत मेनन यांना शॉर्ट रन नाही असं सांगितलं पाहिजे होतं. मेनन यांनी जर निर्णय बदलला असता तर कोणाला यावर आक्षेप नसता.'

अभिनेत्री प्रीति जिंटाने म्हटलं की, 'मी नेहमी जय-पराजय खेळ भावनेने स्वीकारण्यावर विश्वास ठेवते. पण नियमांमध्ये बदल आवश्यक आहेत. जो जिंकला तो जिंकला पण भविष्यात असं होता कामा नये.'