Team India: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, 'हा' फलंदाज रुग्णालयात दाखल

Indian Cricket Team: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत एका फलंदाजाला अचानक रुग्णालयात दाखल करावे लागले. या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा हा खेळाडू आहे.

Updated: Nov 14, 2022, 10:36 AM IST
Team India: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, 'हा' फलंदाज रुग्णालयात दाखल title=

Vijay Hazare Trophy 2022:  विजय हजारे ट्रॉफी 2022 (Vijay Hazare Trophy 2022) ला धमाकेदार सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये वरिष्ठ खेळाडूंसोबतच तरुणांनीही चांगली कामगिरी केली आहे. या सगळ्या दरम्यान या स्पर्धेशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. या स्पर्धेत मुंबईकडून (Mumbai) खेळणाऱ्या 'या' युवा खेळाडूला अचानक रुग्णालयात दाखल करावे लागले. हा खेळाडूही गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

'हा' खेळाडू रुग्णालयात दाखल 

विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2022) खेळण्यासाठी मुंबईचा संघ रांचीमध्ये आहे. दरम्यान, संघाचा स्फोटक फलंदाज सर्फराज खानला (Sarfaraz Khan) रुग्णालयात दाखल करावे लागले. पोटात दुखायला लागल्यामुळे सरफराज खानला रुग्णालयात नेण्यात आले. सरफराज रविवारी सर्व्हिसेसविरुद्ध खेळताना दिसला नाही.

वडिलांनी सांगितलं नेमकं काय झालंय

सरफराजचे वडील नौशाद खान (Naushad Khan) यांनी खुलासा केला की,  सरफराज खानला मागच्या अनेक दिवसांपासून मुतखड्याचा (kidney stones) त्रास आहे. त्यामुळे त्यांच्या पोटात अधिक दुखते. मुतखडा अधिक लहान आहे. परंतु त्याचा सरफराजला अधिक त्रास होतो, असं त्याचे नौशाद खान यांनी क्रिकबझ या वेबसाइटला सांगितले आहे. आता सरफराज खान बरा असून त्याला आज रुग्णालयातून सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. पुढच्या मॅचमध्ये सरफराज खान खेळण्याची शक्यता आहे.   

वाचा : गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर! 

रणजी ट्रॉफी 2022 मध्ये सर्वात यशस्वी

रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) या मोसमात सरफराज खानने सर्वाधिक धावा केल्या. सरफराज खानने रणजी ट्रॉफीच्या या हंगामातील 6 सामन्यात 122.75 च्या सरासरीने सर्वाधिक 982 धावा केल्या. सर्फराजने या कालावधीत 4 शतके आणि 2 अर्धशतके झळकावली. सरफराजने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 80 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये 2000 हून अधिक धावा केल्यानंतर, फक्त सर डॉन ब्रॅडमन यांचीच त्यांच्यापेक्षा चांगली सरासरी आहे. त्याचवेळी त्याने दुलीप ट्रॉफी 2022 मध्येही शतक झळकावले.