IPL सोडून राजस्थानचा स्टार खेळाडू परतला मायदेशी

राजस्थानला मोठा धक्का, सामना जिंकल्यानंतर या खेळाडूनं सोडलं IPL, जाणून घ्या कारण

Updated: May 8, 2022, 11:42 AM IST
IPL सोडून राजस्थानचा स्टार खेळाडू परतला मायदेशी title=

मुंबई : राजस्थान टीमने पंजाबवर 6 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आनंद साजरा करताना राजस्थान टीमचं थोडं टेन्शनही वाढलं आहे. कारण प्रसिद्ध खेळाडूने आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल मध्येच सोडून हा खेळाडू मायदेशी परतला आहे. 

प्रसिद्ध शिमरॉन हेटमायर मायदेशी परतला आहे. राजस्थानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याने याबाबत माहिती दिली. व्हिडीओमध्ये हेटमायर चाहत्यांना खास मेसेज दिला. तो लवकरच बाबा होणार आहे. त्यामुळे तो मायदेशी परतला आहे. 

शिमरॉन हेटमायरने व्हिडिओमध्ये खुलासा केला. आयपीएल अर्धवट सोडून आपल्या देशात का परतत आहे. हेटमायर बाबा होणार आहे. त्यामुळे तो पंजाब सामन्यानंर मायदेशी परतल्याची माहिती मिळाली आहे. बाळाच्या जन्मानंतर तो पुन्हा टीमसोबत येईल असं सांगितलं जात आहे. 

पंजाब विरुद्ध सामन्यात त्याने 16 बॉलमध्ये 31 धावा केल्या. यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकार ठोकले. यंदाच्या हंगामात त्याने एक रेकॉर्डही आपल्या नावावर केला.