ड्रेसिंग रूममध्ये 'या' खेळाडूशी जोरदार भांडला होता Shikhar Dhawan; स्वतः केला खुलासा

भारतीय टीमचा ओपनर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) त्याच्या खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र टीम इंडियातील एका खेळाडूशी चांगलचं मोठं भांडण झालं होतं. एका इंटरव्यूमध्ये खुद्द शिखर धवनने याबाबत खुलासा केला आहे. 

Updated: Feb 15, 2023, 05:28 PM IST
ड्रेसिंग रूममध्ये 'या' खेळाडूशी जोरदार भांडला होता Shikhar Dhawan; स्वतः केला खुलासा title=

Shikhar Dhawan : भारतीय क्रिकेट टीममधून (Team India) सध्या बाहेर असलेला ओपनर शिखर धवन (Shikhar Dhawan) सध्या सोशल मीडियावर एक्टिव्ह असतो. क्रिकेटपासून दूर राहूनही शिखर मात्र नेहमीच चांगलाच चर्चेत असतो. शिखरचा मस्तीचा मूड आपल्या प्रत्येकालाच ठाऊक आहे. मात्र मस्ती आणि शांत स्वभावाच्या शिखर धवनच्या टीम इंडियातील एका खेळाडूशी चांगलचं मोठं भांडण झालं होतं. एका इंटरव्यूमध्ये खुद्द शिखर धवनने याबाबत खुलासा केला आहे. 

Shikhar Dhawan चं ईशान किशनसोबत झालं भांडण

भारतीय टीमचा ओपनर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) त्याच्या खराब फॉर्ममुळे टीम इंडियातून बाहेर आहे. न्यूझीलंडविरूद्ध त्याने शेवटची वनडे सिरीज खेळली होती. त्यानंतर श्रीलंका आणि न्यूझीलंडविरूद्धच्या सिरीजसाठी त्याचं सिलेक्शन झालं नाही. 

नुकत्याच एका चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शिखरने खुलासा केला आहे. यावेळी धवनला विचारण्यात आलं की, ड्रेसिंग रूममनध्ये त्याचं कोणाशी भांडणं झालं होतं का?, या प्रश्नाचं उत्तर देताना शिखर म्हणाला, माझं एकदा ईशान किशनशी भांडण झालं होतं. ईशान टीमच्या सर्व खेळांडूंसोबक मस्करी करत होता. त्यावेळी मला त्याचा खुप राग आला होता. यावेळी माझा राग पाहून ईशान काहीही न बोलता शांत झाला होता. 

मात्र काही दिवसांनी हे प्रकरण नॉर्मल झालं. मात्र, आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, सर्व भांडी एकत्र राहणार तर त्याचा आवाज तर येणारच! जिथ तुम्ही 200 दिवश एकत्र राहत असाल तिथे वाद-विवाद हे होणारच, असंही शिखर धवनने सांगितलं आहे. 

टीम इंडियाचा अनुभवी शिखर धवनची कारकीर्द चांगली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत रोहित शर्मासह अनेक वेळा टीमला विजय मिळवून दिला आहे. त्याचबरोबर त्याच्या आणि रोहितमध्ये अनेक शतकी पार्टनरशिपचाही समाविष्ट आहे. सध्या शिखर त्याच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण टप्प्यातून जातोय. त्याने टेस्ट, वनडे आणि टी-20 कारकिर्दीत अनुक्रमे 34, 167 आणि 68 सामने खेळलेत. यामध्ये त्याने अनुक्रमे 2315, 6793 आणि 1759 असे रन्स केले आहेत.