India vs South ODI Series: भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज शिखर धवन याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ODI मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. धवन गेल्याकाही वर्षांपासून आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे, पण तरीही त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळत नाही. यावर धवनने मोठी गोष्ट सांगितली आहे. त्याचबरोबर त्याने स्वतःसाठी मोठे टार्गेट ठेवल्याचे सांगितले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी शिखर धवन पत्रकार परिषदेत म्हणाला, 'एवढी अप्रतिम कारकीर्द माझ्यासाठी मोठी आहे. मी भाग्यवान आहे. जेव्हा-जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी माझे योगदान देत असतो आणि याबाबत तरुणांसोबत शेअर करतो. आता माझ्याकडे नवीन जबाबदारी आहे, पण मी आव्हानांमध्ये संधी शोधतो आणि त्याचा आनंद घेतो.
शिखर धवन पुढे म्हणाला, 'माझे लक्ष्य 2023 विश्वचषक आहे. मला स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे आहे आणि सकारात्मक राहायचे आहे. धवन टी-20 संघातून बाहेर पडत असला तरी एकदिवसीय सामन्यात त्याला सतत स्थान मिळत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यातही त्यांनी संघाची धुरा सांभाळली होती. शिखर धवनची बॅट आयसीसी स्पर्धेत खूप तळपते.
गेल्या दोन वर्षांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या शिखर धवन याला तंदुरुस्त राहायचे आहे आणि 2023 मध्ये भारतात होणारा एकदिवसीय विश्वचषक खेळायचा आहे. श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर तो भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार होता आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तो पुन्हा जबाबदारी स्वीकारेल. धवनने 34 कसोटीत 2315 धावा, 158 एकदिवसीय सामन्यात 6647 आणि 68 टी-20 सामन्यात 1759 धावा केल्या आहेत.