मुंबई : भारतीय क्रिकेट टीमला पुढीच्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळायचा आहे. या टेस्ट सामन्यापूर्वी भारतीय टीम लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामना खेळतेय. या सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात 8 विकेट्स गमावून 246 रन्स केले. तर प्रत्युत्तरात लीसेस्टरशायरची टीम 244 रन्समध्ये गारद झाला. पण लेस्टरशायरच्या खेळीदरम्यान मैदानावर एक मजेदार घटना घडली.
टीम इंडिया लीसेस्टरशायरविरुद्ध गोलंदाजी करण्यासाठी आली तेव्हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये एक खेळाडूने विकेट घेतल्यानंतर शार्दुल ठाकूरला धक्का मारला. हा खेळाडू दुसरा कोणी नसून रवींद्र जडेजा होता. झालं असं की, शार्दुलने लीसेस्टरशायरच्या एका फलंदाजाला बाद करून पहिली विकेट मिळवली.
फलंदाजाने शार्दुलच्या वेगाने फिरणाऱ्या बॉलवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण बॉल थेट स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रवींद्र जडेजाच्या हातात गेला. या विकेटनंतर भारतीय खेळाडूंनी सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. त्यानंतर गंमतीत जडेजाने शार्दुलला धक्का दिला. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
Bates (8), Jadeja, Thakur.
Here's the moment @imshared picked up his first wicket of the day. Bates edged behind and Jadeja pouched the catch at first slip.
LEI 157/6.
#IndiaTourMatch | #LEIvIND | #TeamIndia pic.twitter.com/Lhp4TkhQuo
— Leicestershire Foxes (@leicsccc) June 24, 2022
या सिरीजबद्दल बोलायचं झालं तर सध्या टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. ही मालिका 2021 मध्ये खेळवली जात होती, परंतु 5 व्या टेस्ट सामन्यापूर्वी टीम इंडियातील अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाली, त्यामुळे हा सामना वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आला. आता भारतीय संघाच्या नजरा वर्षांनंतर पुन्हा एकदा इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याकडे आहे.