मोहम्मद शमीच्या पत्नीच्या पहिल्या पतीबाबत धक्कादायक खुलासे

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद आणखीनच वाढत चाललाय. नुकताच हसीन जहांने शमी विरोधात पोलिसांकडे केस दाखल केली. 

Updated: Mar 11, 2018, 11:01 AM IST
मोहम्मद शमीच्या पत्नीच्या पहिल्या पतीबाबत धक्कादायक खुलासे title=

मुंबई : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद आणखीनच वाढत चाललाय. नुकताच हसीन जहांने शमी विरोधात पोलिसांकडे केस दाखल केली. 

शमीविरोधात पत्नीला विष देऊ मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी केस दाखल करण्ायात आलीय. तसेच शमीच्या पत्नीने त्याच्याविरोधाता मानसिक तसेच शारिरीक छळ केल्याचीही तक्रार दाखल केलीये.

दरम्यान, मोहम्मद शमीने मात्र आपल्यावरील आरोप चुकीचे असल्याचे म्हटलेय. मला चुकीच्या आरोपांमध्ये गोवले जात असल्याचे शमीचे म्हणणे आहे. 

या सगळ्या आरोपा-प्रत्यारोपादरम्यान शमीच्या बायकोचा पहिला पती समोर आलाय. हसीन जहां शमीची पहिली पत्नी आहे मात्र हसीनचे शमीसोबतचे हे दुसरे लग्न आहे. 

मोहम्मद शमी आणि हसीन यांचे २०१४मध्य़े लग्न झाले होते. हसीन जेव्हा पहिल्यांदा शमीला भेटली होती तेव्हा तिचे पहिले लग्न तुटले होते तसेच तिला दोन मुलीही होत्या.

हसीन जहांचे पहिले लग्न सैफुद्दीन नावाच्या व्यक्तीशी झाले होते. हसीन आणि सैफुद्दीन यांना दोन मुली आहेत. एक दहावीत तर दुसरी सहावीत शिकते. हसीन आणि सैफुद्दीन यांचे २००२मध्ये लग्न झाले. त्यानंतर २०१२मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 

शमी आणि हसीन यांच्या वादादरम्यान सैफुद्दीनने एका न्यूज चॅनेलला इंटरव्ह्यू दिलाय. यात सैफुद्दीन म्हणाला, हसीन महत्त्वाकांक्षी महिला आहे. तिच्या खूप काही अपेक्षा आहेत. मला माहीत नाही तिने मला का सोडलं. घटस्फोटानंतर माझ्या तिच्याशी संपर्क आला नाही. मात्र दोन्ही मुली अनेकदा आपल्या आईशी संपर्कात असतात. 

सैफुद्दीन वीरभूम जिल्ह्यातील सुरी बाजार परिसरात बाबू स्टोर नावाचे छोटेसे दुकान चालवतात.