लंडन: विंबल्डन आठव्यांदा जिंकण्याच्या मार्गावर असलेली अमेरिकी टेनिसपटू सेरेना विल्यम्स काहीशी भावूक झाल्याचे अचानक पहायला मिळाले. मुलगी ओलंपियाने टाकलेले पहिले पाऊल स्पर्धेतील सततच्या व्यग्रतेमुळे पाहता आले नाही. आपण या क्षणाचे साक्षीदार होऊ शकलो नाही याचे तिला प्रचंड दु:ख झाले आणि तिला रडू कोसळले.
सेरेनाने काही महिन्यांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला. त्यामुळे ती प्रदीर्घ काळ मैदानावर दिसली नाही. पण, आई झाल्यावर सेरेनाने पुन्हा एकदा आपली नवी कारकीर्द सुरू केली. टेनिस कोर्टवर पुनरागमन केले. सेरेना सध्या लंडन येथे आहे. पण, स्पर्धेतील सततच्या व्यग्रतेमुळे तिला ओलंपियापासून दूर रहावे लागत आहे. गेल्या वर्षी सप्टेबर महिन्यात जन्मलेली ओलंपिया जेव्हा पहिल्यांदा चालायला लागली तेव्हा सेरेना तेथे उपस्थित नव्हती. नेमका हाच क्षण चूकल्याचे सेरेनाला दु:ख आहे.
She took her first steps... I was training and missed it. I cried.
— Serena Williams (@serenawilliams) July 7, 2018
सेरेनाने आपले दु:ख ट्विटरवर व्यक्त केले आहे. भावना व्यक्त करताना ट्विटरवर ती म्हणते, 'जेव्हा तीने पहिले पाऊल टाकले तेव्ही मी प्रशिक्षण घेत होते. त्यामुळे पहिल्यांदा चालताना मी तिला पाहिले नाही. मला रडू आले.'