Ritika Sajdeh: रोहितला रडताना पाहून स्वतःला रोखू शकली नाही रितीका; कॅमेराची नजर जाताच फुटला अश्रूंचा बांध

ODI World Cup 2023: फायनल सामन्यामध्ये रितिका सजदेह स्टँडवर उभी असताना तिचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी कर्णधार रोहित शर्माला इतक्या मोठ्या सामन्यात हरताना पाहून ती निराशी झाली.

सुरभि जगदीश | Updated: Nov 20, 2023, 01:44 PM IST
Ritika Sajdeh: रोहितला रडताना पाहून स्वतःला रोखू शकली नाही रितीका; कॅमेराची नजर जाताच फुटला अश्रूंचा बांध title=

ODI World Cup 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रविवारी वनडे वर्ल्डकप 2023 चा फायनल सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या टीमने भारताचा 6 विकेट्सने पराभव करत वर्ल्डकपवर कब्जा मिळवला आहे. वर्ल्डकपच्या स्पर्धेत सलग 10 सामने जिंकणाऱ्या टीम इंडियासाठी हा मोठा धक्का होता. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माचे डोळे पाणावले होते. तर दुसरीकडे रोहितला पाहून रितीकाची अवस्थाही वाईट झाली होती.

फायनल सामन्यामध्ये रितिका सजदेह स्टँडवर उभी असताना तिचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी कर्णधार रोहित शर्माला इतक्या मोठ्या सामन्यात हरताना पाहून ती निराशी झाली. रोहितप्रमाणे तिचेही डोळे पाणावले होते. पती आणि देशाच्या पराभवाचं दु:ख रितिकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. रितिकाचा हा भावनिक व्हिडिओ चाहते सोशल मीडियावर खूप शेअर झाला आहे. 

केवळ रितिका सजदेहच नाही तर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी देखील उदास दिसत होत्या. फायनल सामना पाहण्यासाठी अनेक खेळाडूंचं कुटुंब स्टँडमध्ये उपस्थित होतं. मात्र सामन्यानंतर त्यांच्या पदरी निराशा पडली होती. 

सिराज आणि विराटंही झाले होते भावूक

अंतिम सामन्यात झालेल्या या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली प्रमाणेच गोलंदाज मोहम्मद सिराज यालाही भर मैदानातच रडू कोसळलं. मैदानावर रडत असलेल्या मोहम्मद सिराजला जसप्रीत बुमराहने सांभाळून घेतलं. तर कर्णधार रोहित पाणावलेल्या डोळ्यांनी मैदानाबाहेर जाताना दिसला. तर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 10 रन्सची गरज असताना विराटच्या चेहऱ्यावर दुःख दिसून आलं.

ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाचा पराभव

वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया टीमचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 240 रन्स करणं शक्य झालं आहे. केएल राहुलने 107 बॉल्समध्ये 66 रन्सची खेळी तर विराट कोहलीने 54 रन्सची खेळी खेळली. दुसरीकडे रोहितने 31 बॉल्समध्ये 47 रन्स केले. 

टीम इंडियाने दिलेल्या 241 रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला शमीने पहिला धक्का दिला. त्यानंतर बुमराहने आक्रमक गोलंदाजीचं प्रदर्शन करत दोन विकेट्स काढल्या. टीम इंडियाला खरा धोका होता, तो ट्रेविस हेड याच्याकडून. ट्रेविस हेड आणि मार्नस लाबुशेन यांनी शतकीय भागेदारी केली अन् टीम इंडियाला बॅकफूटवर पाठवलं. अखेरीस ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने विजय झाला आहे.